मराठवाडा

घरफोडीतील चोरास अटक, एक लाख ८० हजारांचा माल जप्त

सकाळ वृत्तसेवा

लातूर  ः उदगीर येथे झालेल्या घरफोडीतील चोरास अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले असून त्यांच्याकडून एक लाख ८० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. उदगीर येथील दत्तनगर भागात ता.२१ फेब्रुवारी रोजी योगीता उस्तुर्गे या घराला कुलूप लावून देवदर्शनासाठी जाकनाळ येथे गेल्या होत्या.
घरी कोणी नाही हे पाहून दुपारी बारा ते एकच्या दरम्यान चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला होता. यात चोरट्यांनी कपाटातील साडेचार तोळे सोन्याचे दागिणे व रोख चार हजार असा एकूण माल चोरून नेला होता. या प्रकरणी उदगीर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.


या घटनेचा समांतर तपास येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली या शाखेच्या पोलिस पथकाने केला होता. हा तपास करीत असताना सोमवारी (ता. २४) येथील मळवटी रस्त्यावरील आकाश बाबुराव कांबळे (वय१९) व त्याच्या साथीदाराने ही चोरी केल्याची माहिती पोलिसाना मिळाली. त्यानंतर या पथकाने मळवटी रस्त्यावर जाऊन कांबळे याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चौकशी केली असता उदगीरची चोरी त्यानेच केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून साडे चार तोळे सोन्याचे दागिणे असा एकूण एक लाख ८० हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. ही चोरी उघडकीस आणण्यासाठी पथकातील संजय भोसले, योगेश गायकवाड, राहुल सोनकांबळे, हारुण लोहार यांनी पुढाकार घेतला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT