house was struck by lightning and household goods sakal
मराठवाडा

Lightning : घरावर वीज पडून संसारोपयोगी साहित्यासह रोख रक्कमही जळून खाक; सुदैवाने जीवितहानी टळली

पत्र्याच्या घरावर वीज पडून घरातील संसारोपयोगी साहित्यासह रोख रक्कम जळुन खाक झाली. सुदैवाने जीवितहानी टळली.

लक्ष्मीकांत कुलकर्णी

कुंभार पिंपळगाव - येथील कुंभार खिडकी ते सरस्वती भुवन प्रशाला रस्त्यावरील सावता नगर भागातील बालु सोपानराव मुसळे यांच्या पत्र्याच्या घरावर वीज पडून घरातील संसारोपयोगी साहित्यासह रोख रक्कम जळुन खाक झाली. सुदैवाने जीवितहानी टळली.

श्री. मुसळे घराला कुलूप लावून शेतात गेलेले होते, सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान ते शेतातुन घरी आले व कुलुप उघडत असताना अचानक विजेचा कडकडाट झाला व घरावर वीज पडली. श्री. मुसळे तत्काळ तेथुन पळाले, पळताना त्यांना विजेची वाफ लागली, मात्र त्यांनी घरापुढच्या दुसऱ्या घराचा आधार घेतला.

वीज पडल्याने मुसळे यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्यासह टिव्ही, फ्रीज, कुकर, कुलर, मिक्सर, पंखे या इलेक्ट्रॉनिक वस्तू, स्टीलचे डब्बे ही चिरले तर घरातील धान्य, कपडे, किराणा, गादी व काही रोख रक्कमही जळून गेली. याप्रकरणी तलाठी संदिप नरूटे यांनी घटनेची माहिती वरिष्ठांना कळवली असून बुधवारी सकाळी नुकसानीचा पंचनामा केला जाईल असे सांगितले.

विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस-दरम्यान कुंभार पिंपळगावसह परिसरात मंगळवारी (ता. २४) सायंकाळी साडेपाच ते साडेसहा तासभर वादळी वारे आणि विजेच्या प्रचंड कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसाने शेतातील काढणीला आलेल्या, काढुन टाकलेल्या सोयाबीनच्या पिकाचे मोठे नुकसान झाले.

दरम्यान पावसामुळे वीजपुरवठाही खंडित झाला होता, रात्री उशिरापर्यंत सर्वत्र अंधार होता. घनसावंगी येथे १३२ केव्ही उपकेंद्रात बिघाड झाल्याने वीजपुरवठा सुरळीत होवू शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ड्रायव्हरच्या बाजूला मान खाली घालून बसलेले मनोज जरांगे; तब्येत अचानक बिघडली, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू, नेमकं काय झालं?

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

Chamoli Tunnel Tragedy: ३० तासांनंतरही ३ मजूर बेपत्ता; बोगद्यातील साचलेले पाणी ठरतेय रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये मुख्य अडथळा

Marathi News Live Updates : पुण्यातील डेक्कन परिसरातील कॅफेत पहाटे कोयता गँगचा धुमाकूळ

Khambatki Ghat Traffic : पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा; पारगाव-खंडाळा परिसरात वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT