मराठवाडा

शंभर कोटींचे रस्ते अडकले

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - शंभर कोटींच्या रस्ते कामातील अडथळे सुरूच असून, आता कंत्राटदारांनी बॅंक गॅरंटी भरण्यास विलंब केल्याचा प्रकार समोर आला आहे. स्थायी समितीने निविदा ता. दोन नोव्हेंबरला मंजूर केली होती. त्यानंतर दहा दिवसांत पुढील प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे होते; मात्र अद्याप कंत्राटदार पैसे भरण्यास समोर आलेले नाहीत. 

शासनाने शहरातील रस्त्यांसाठी शंभर कोटींचा निधी दिला होता. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून ही कामे विविध कारणांमुळे रखडली होती. अनेक अडथळ्यांनंतर स्थायी समितीने शंभर कोटींच्या रस्ते कामांना ता. दोन नोव्हेंबरला मंजुरी दिली. ‘स्थायी’च्या मंजुरीनंतर कंत्राटदारांनी करार व बॅंक गॅरंटीची प्रक्रिया दहा दिवसांत पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, मंगळवारी (ता. २७) पंचवीस दिवस पूर्ण झाल्यानंतरही महापालिकेकडे बॅंक गॅरंटीसाठीची दोन टक्के रक्कम भरण्यात आलेली नाही. महापालिकेने नोटीस बजावूनही कंत्राटदार रक्कम भरण्यास टाळाटाळ करीत आहेत.

२४ डिसेंबरला नारळ फुटणार 
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक घेतली. त्यात त्यांनी ता. २४ डिसेंबरला रस्ते कामांचे भूमिपूजन करण्याची घोषणा केली. याचवेळी स्मार्ट सिटी योजनेतून सुरू केल्या जाणाऱ्या शहर बसचाही प्रारंभ होणार आहे, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.

अशी आहेत ३० कामे 
 जीएनआय कन्स्ट्रक्‍शन     - १९ कोटी ४० लाख
 जेपी कन्स्ट्रक्‍शन     - २० कोटी २६ लाख
 मस्कट कन्स्ट्रक्‍शन     - २० कोटी ३० लाख 
 राजेश कन्स्ट्रक्‍शन     - १८ कोटी ८७ लाख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT