कॉँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 
मराठवाडा

मी अशोक शंकरराव चव्हाण....म्हणताच जल्लोष...

अभय कुळकजाईकर

नांदेड - मी अशोक शंकरराव चव्हाण....असे म्हणताच नांदेडमध्ये कॉँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता. ३०) दुपारी एक वाजता एकच जल्लोष केला. नांदेडमध्ये शिवाजीनगर येथील त्यांच्या ‘आनंद निलयम’ निवासस्थानासमोर तसेच नवा मोंढा येथील कॉँग्रेसच्या पक्ष कार्यालयासमोर फटाके फोडण्यात आले. त्याचबरोबर नांदेडसह लोहा, भोकर, अर्धापूर, मुदखेड आदी तालुक्यात तसेच हिंगोलीतही कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
 
कॉँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महाआघाडी सरकारमध्ये कॅबीनेट मंत्री म्हणून समावेश होणार, हे गेल्या दोन दिवसापासून जवळपास निच्शित झाले होते. त्यामुळे नांदेड तसेच मराठवाड्यातील कॉँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले होते. त्याचबरोबर अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघातूनही पदाधिकारी, कार्यकर्ते रवाना झाले होते. 

ढोल, ताशांचा गजर
सोमवारी दुपारी एक वाजता अशोक चव्हाण यांनी कॅबीनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नांदेडला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. शिवाजीनगर भागात त्याचबरोबर नवा मोंढा येथील पक्ष कार्यालयात तसेच कौठा, सिडको, जुना मोंढा आदी भागातही कार्यकर्त्यांनी फटाके फोडून पेढे वाटले. ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. हिंगोली शहरातील गांधी चौक येथे कॉॅँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत जल्लोष केला. फटाके फोडून पेढे वाटले. 

आमदारांसह अनेकजण उपस्थित
नांदेड जिल्ह्यातील कॉँग्रेसचे आमदार अमर राजूरकर, रावसाहेब अंतापूरकर, माधव पाटील जवळगावकर, मोहन हंबर्डे यांच्यासह जिल्हा परिषद, महापालिकेतील कॉँग्रेसचे पदाधिकारी, सदस्य तसेच कॉँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते दोन दिवसापूर्वीच मुंबईला शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी गेले होते. श्री. चव्हाण यांच्यासोबत शपथविधी घेताना त्यांच्या पत्नी माजी आमदार अमिता चव्हाण उपस्थित होत्या.  

भोकरमध्ये जल्लोष...
भोकर विधानसभा मतदारसंघ आणि चव्हाण कुटुंबियांचे नाते अतूट आहे. या मतदारसंघाचे यापूर्वी ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण यांनी नेतृत्व केले होते. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी नेतृत्व केले. मध्यंतरी अशोक चव्हाण नांदेडचे खासदार असताना त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांनी भोकर मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. आता २०१९ मध्ये पुन्हा एकदा अशोक चव्हाण भोकर मतदारसंघातून तब्बल ९७ हजार मताधिक्याने निवडून आले. त्यामुळे भोकर मतदारसंघातील भोकर, अर्धापूर आणि मुदखेड या तिन्ही तालुक्यात कॉँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

SCROLL FOR NEXT