Identify the potential and then choose the career
Identify the potential and then choose the career  
मराठवाडा

क्षमता ओळखून क्षेत्र निवडा - प्रा. आर. जी. बीरादार

वृत्तसंस्था

औरंगाबाद - बारावीचा निकाल लागला. आता नेमके कोणत्या शाखेत जायचे ते आधी ठरवा. अभियांत्रिकीत प्रवेश घ्यायचा असेल तर तेथील खर्च आणि राहण्याची व्यवस्था बघा. महाविद्यालय किती जुने यावर न जाता सध्या त्या महाविद्यालयात काय शिक्षण व संधी मिळते ते बघा. कुणाच्या सांगण्यावर क्षेत्र किंवा महाविद्यालय निवडण्याची चूक करु नका, असा सल्ला प्रा. आर. जी बिरादार यांनी दिला. 

सिडकोतील जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज नाट्यगृहात आयोजित "यिन'च्या समर युथ समिटमध्ये सोमवारी (ता. 11) ते बोलत होते. 'सकाळ'च्या माध्यमातून मराठवाड्यातील युवकांशी संवाद साधण्याची संधी 20 वर्षांनंतर मिळाल्याचा आनंद त्यांनी बोलून दाखविला. 

इंजिनिअरींगच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल बोलतांना ते म्हणाले की, न्यूनगंड बाळगू नका. पुण्या-मुंबईत चांगले शिक्षण मिळते मात्र मराठवाडाही चांगले शिक्षण देण्यात मागे नाही. पुण्यातील नावाजलेले सर्व विद्याशाखेतील प्राध्यापक बहुतांश मराठवाड्यातील आहेत. त्यामुळे आपली भाषा जर पुढच्याला समजत असेल तर त्याच भाषेत अभिव्यक्त व्हा. इंग्रजी शिका त्यामुळे तुम्हाला जास्त संधी मिळेल. आता अभियांत्रीकीची प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन आहे. पर्यायी अर्ज भरताना कोड चुकू देऊ नका. स्वतः महाविद्यालय पाहिल्याशिवाय, तेथील विद्यार्थ्यांशी व शिक्षकांशी चर्चा केल्याशिवाय त्याला प्राधान्यक्रम देऊ नका. चार वर्ष अभ्यास करा. प्रत्येक कार्यामध्ये सहभागी व्हा. आत्मविश्‍वास वाढवा, सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT