मराठवाडा

शासनाच्या पोलिओ अभियानातील लसींची अवैध विक्री 

योगेश पायघन

औरंगाबाद : केंद्र शासनाच्या पोलिओमुक्त अभियानासाठी बनवण्यात आलेल्या लसींचे लेबल बदलून खुल्या बाजारात विक्री करणारे रॅकेटचा अन्न व औषध प्रशासनाने पर्दाफाश केला. याप्रकरणी शहरातील अरिहंत केमिस्ट या मेडिकलमधून 2100 रु. किमतीचे लेबल लावलेल्या 100 पोलिओ व्हायल्सचे नमुने नमुना विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले.

हैदराबाद येथील शांथा बायोटेक्निक्स ही कंपनी पोलिओ डोसचे उत्पादन करते मात्र केंद्र शासन त्याची संपूर्ण खरेदी करते.या कंपनीने बाजारात त्यांचे व्हायल्स विक्री होत असल्याची तक्रार केली होती. दरम्यान, शहरात 2100 रुपयांना पोलीओचे इंजेक्शन द्वारे देण्यात येणाऱ्या पोलिओ व्हायल्स विक्री होत असल्याची माहिती औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार अन्न प्रशासनाचे सह आयुक्त संजय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली औषध निरीक्षक राजगोपाल बजाज यांनी धाड टाकून अरिहंत केमिस्ट इथून शंभर 100 पोलिओ व्हायल्सचे नमुने घेतले.

याप्रकरणी, राहुरी येथील सप्लायर, अहमदाबादची सप्लायर कंपनी व नाशिक आणि औरंगाबाद येथील औषध विक्रेते अशा सहा संशयितांवर नाशिक येथे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या सापडलेल्या लसीचे व्हायल बनावट असल्याचा अहवाल हैदराबादच्या उत्पादक कंपनीने दिल्याने या प्रकरणातील गुंता वाढला आहे.

त्या 100 लसीच्या व्हायलचे नमुने हिमाचल प्रदेशातील कसोली येथील प्रयोग शाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात आल्याचे। औषध निरीक्षक राजगोपाल बजाज यांनी सकाळ ला सांगितले तर या पोलिओ व्हायल्सचे लेबल काढून 2100 रुपये किंमतीचे लेबल लावण्यात आले होते. असे औषध प्रशासनाचे आयुक्त संजय काळे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: आम्ही काम करतो, इतरांसारख खोट बोलत नाही, अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT