mukhed.jpg 
मराठवाडा

उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार सुधारा ः पालकमंत्री

सुनिल पौळकर


मुखेड, (जि. नांदेड) ः नांदेड जिल्हा हा कोरोनाबाबतीत ‘ग्रीन झोन’ मध्ये असल्याने पुढील काळात सामाजिक दुरी संकल्पना साकारत जिल्हा सीमावर गस्त वाढवून अंतर्गत शिथीलता आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. यासाठी जनतेने सुद्धा सहकार्य करणे आवश्यक असल्याचे मत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. त्याच बरोबर शहरातील उपजिल्हा रुग्णालयला कोरोना रुग्णालय म्हणून निवड केली असून कोरोना रुग्णालय मुखेड व नांदेड येथेच अाहे. या रूग्णालयात डाॅक्टर व कर्मचारी यांनीही व्यवस्थित काम करीत कोणाचीही तक्रार येणार याची काळजी घ्यावी. अशा सूचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आढावा बैठकीत दिली.

उपाययोजना संदर्भात आढावा
मुखेड तालुक्यातील कोरोना (कोव्हिड -१९) विषाणूजन्य आजाराच्या प्रादुर्भाव व लाॅकडाऊनमुळे तालुक्यातील नागरीकांची समस्या व उपाययोजना या संदर्भात आढावा बैठक तहसील कार्यालय येथे सोमवारी (ता.१३) पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या वेळी आमदार डॉ. तुषार राठोड, जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, नगराध्यक्ष बाबूराव देबडवार, जिल्हा परिषद सदस्य दशरथ लोहबंदे, शेषेराव चव्हाण, उपविभागीय अधिकारी शक्ती कदम, उपविभागीय पोलिस अधीक्षक रमेश सरोदे, तहसीलदार काशिनाथ पाटील, गटविकास अधिकारी कैलास बळवंत, मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी रमेश गवाले, वैद्यकीय अधीक्षक आनंद पाटील, नोडल अधिकारी डाॅ. नागेश लखमावार, तालुका कृषी अधिकारी शिवाजी शितोळे, नायब तहसीलदार महेश हांडे उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, नांदेड जिल्हा हा ग्रिन झोन मध्ये असल्याने जिल्ह्याची सीमा बंद करून जिल्ह्यापुर्ता लाॅकडाऊन उठवण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. या विषयी मी मंत्री मंडळात चर्चा करणार आहे. लाॅकडाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने नोकरदारांचा पगार कसा करावा याची चिंता सरकारला पडली आहे. आजच्या आढावा बैठकीत तालुक्यातील पाणी टंचाई संदर्भातही चर्चा झाली असून तालुक्यातील सर्वच अधिकारी व कर्मचारी चांगल्याप्रकारे काम करीत असल्याने समाधान व्यक्त केले अाहे.

या बैठकीला पेशकार गुलाब शेख, नंदकुमार मडगुलवार, व्यंकट लोहबंदे, डाॅ. श्रावण रॅपनवाड, जयभिम सोनकांबळे, संतोष बोनलेवाड, दिलीप कोडगिरे, उत्तम चौधरी, नरसिंग आकुसकर, सहाय्यक पोलिस निरिक्षक भाऊसाहेब मगरे, श्याम एमेकर, विनोद आडेपवार, मैनोद्दिन शेख, डाॅ. रणजित काळे, सुरेश बेळीकर, मारोती घाटे, जयप्रकाश कानगुले यांसह आरोग्य, महसुल, पंचायत समिती व नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT