in november Online Exam for Hingoli ZP Vacancies Schedule announced marathi news Sakal media
मराठवाडा

Hingoli ZP Recruitment : हिंगोली जि.प.च्या रिक्त जागांसाठी नोव्हेंबरला ऑनलाईन परीक्षा; वेळापत्रक जाहीर

वेळापत्रक जाहीर : जिल्ह्यामधील परीक्षा केंद्रात हाेणार परीक्षा

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : येथील जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीमध्ये दर्शविलेल्या पदाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.

हिंगोली जिल्हा परिषदेचे पदभरती जाहिरातीमध्ये नमूद नसलेले परंतू एक नोव्हेंबर, व दोन नोव्हेंबररोजी घेण्यात येणाऱ्या परिक्षेकरिता हिंगोली परीक्षा केंद्र निवड केलेल्या उमेदवारांना इतर जिल्ह्यामध्ये परीक्षा केंद्र देण्यात आलेल्या परिक्षेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

कनिष्ठ यांत्रिकी या पदाची ऑनलाईन परीक्षा एक नोव्हेंबर, रोजी ऑयन डिजिटल झोन, आयडीझेड विष्णुपुरी, एसएसएस इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी, विष्णूपुरी गेट क्र.१८ व २२ नांदेड येथे शिफ्ट क्र. एकमध्ये होणार आहे. रिपोर्टींग टाईम सकाळी सात वाजता आहे.

विस्तार अधिकारी (शिक्षण) व प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांच्या परीक्षा दोन नोव्हेंबर रोजी गिरीराज एंटरप्रायजेस अमरावती, तिसरा मजला, बी - ३ विंग, ड्रिमलँड बिझनेस पार्क, पंजाब नॅशनल बँकेच्यावर, नागपूर रोड, अमरावती या केंद्रावर होणार आहे.

यामध्ये विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदाची परीक्षा शिफ्ट क्र. एकमध्ये होणार आहे. या परिक्षेचे रिपोर्टींग टाईम सकाळी सात वाजता आहे. तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाची परीक्षा शिफ्ट क्र.दोन मध्ये होणार असून रिपोर्टींग वेळ सकाळी १२ वाजता आहे.

वरील सर्व पदाच्या ऑनलाईन परीक्षेकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी ऑनलाईन लिंक जिल्हा परिषद हिंगोलीच्या www.zphingoli.in व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.hingoli.nic.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

उमेदवारांना या लिंकद्वारे प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेता येतील. तसेच उमेदवारांच्या माहितीसाठी मराठी व इंग्रजी भाषेतील माहिती पुस्तिका www.zphingoli.in व www.hingoli.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. उमेदवारांनी या संकेतस्थळावर जाऊन आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यावेत. तसेच ऑनलाईन परिक्षेकरिता उमेदवारांनी त्यांच्या परिक्षेच्या रिपोर्टींग वेळेच्या अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे.

प्रवेशपत्रामध्ये दिलेल्या सूचनांचे सक्त पालन करणे आवश्यक

उमेदवारांनी त्यांच्या प्रवेशपत्रामध्ये दिलेल्या सूचनांचे सक्त पालन करणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स अथवा डिजिटल उपकरणे सोबत आणण्यास सक्त मनाई आहे.

या परिक्षेदरम्यान उमेदवारांने कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार केल्यास त्यांना त्याचक्षणी जिल्हा परिषदेच्या सर्व परीक्षांसाठी अपात्र ठरवून त्यांचे विरुध्द पोलीस गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याचे सूचित केले आहे. जाहिरातीतील नमूद केलेल्या उर्वरित इतर पदाच्या ऑनलाईन परिक्षेचे वेळापत्रक नंतर कळवण्यात येईल.

उपरोक्त सर्व नमूद बाबींची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT