मराठवाडा

Manoj Jarange Patil: जरांगे पाटलांच्या पाठिंब्यासाठी मराठा समाजाने काढला 'बैलगाडी मोर्चा'!

Maratha Reservation: उपोषणाला पाठिंबा म्हणून अनेक भागातून विविध आंदोलने मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत होती.

सकाळ वृत्तसेवा

Yermala : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरु केले होते.त्यांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणुन येरमाळा परिसरातील मराठा समाजाच्या वतीने तलाठी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला मोर्चा संदर्भात मराठा कार्यकर्त्यांनी दोन पूर्वी निवेदन दिले होते.

मराठा आरक्षणा संदर्भात गेल्या महिन्यात मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केले होते.त्यांच्या मागण्या संदर्भात राज्य सरकारने तेरा जुलै तारखेपर्यंत मुदत द्या निर्णय घेऊ म्हणून उपोषण सोडले मात्र तेरा तारखेला कांहीच निर्णय राज्य सरकारने न घेतल्याने मनोज जरांगे पाटील यांनी मराठावाडयातील अनेक जिल्ह्यात मराठा शांतता रॅली काढल्या आणि १८ जुलैला पुन्हा अंतरावली सराठी उपोषण सुरु केले होते.या उपोषणाला पाठिंबा म्हणून अनेक भागातून विविध आंदोलने मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत होती.

आज बुधवारी येरमाळा येथील आठवडी बाजार दिवशीच येरमाळ्यासह परिसरातील गावांनी उपोषणाला पाठिंबा म्हणुन येरमाळा तलाठी कार्यालयावर बैलगाडी मोर्चाचे आयोजन केले होते.या मोर्चाला परिसरातीलदहा बारा गावातुन पन्नास बैलगाड्या सह शेकडो मराठा आंदोलक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गवरील उड्डाणंपूलापासुन,गावातील मुख्य रस्त्यावरुन तलाठी कार्याल्यावर बैल गाडीमोर्चा नेण्यात आला.या वेळी मोर्च्यात आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं,मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालच पाहिजे,एक मराठा लाख मराठा,लडेंगे या मरेंगे हम सब जरांगे,तुमचं आमचं नातं काय,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो,छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या.

मोर्चा तलाठी कार्यालयावर आल्यास मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीचे निवेदन शेतकऱ्यांच्या हस्ते नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे देण्यात आले.

सकाळी ११ वा.बैलगाडी मोर्चा दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषनाचा आज पाचव्या यांची तब्येत खालावल्याने त्यांना दोन दिवसापासून सलाईन सुरु होते.सलाईनवर उपोषण करण्यापेक्षा पुढील आंदोलनाची दिशा ठरवू म्हणतं उपोषण मागे घेतल्याची माहिती मिळाली तरी बैलगाडी मोर्चा दिल्या प्रमाणे काढण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chardham Yatra: नव्या वर्षात बदरी-केदारसह चारी धामांमध्ये मोबाईल नेण्यास बंदी; रीलवर प्रशासनाची कडक 'नजर'

Latest Marathi Live Update: मुख्यमंत्री फडणवीसांकडून गणेश नाईक यांचे कौतुक

CM Yogi Lion Chair: योगी आदित्यनाथ बसणार सिंहासनावर! उत्तराखंडशी आहे स्पेशल कनेक्शन, खुर्चीची वाचा वैशिष्ट्ये

BMC Mayor Politics : मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या महापौर पदाची परंपरा कायम राहणार? राजकीय हालचालींना वेग

धक्कादायक घटना! अमरावतीत हॉटेलमध्ये पर्यटक युवतीवर अत्याचार; परप्रांतीय युवती महाराष्ट्रात फिरण्यासाठी आली अन् काय घडलं..

SCROLL FOR NEXT