Beed Crime sakal
मराठवाडा

Beed Crime : कुख्यात गुन्हेगार गुन्हे शाखेच्या जाळ्यात ;दोन गुन्हे उघडकीस, सव्वापाच लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कुख्यात गुन्हेगार रामेश्वर जंगल्या भोसले औरंगपुरा भागात चोरीचा मुद्देमाल विकण्यासाठी आला असता गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कुख्यात गुन्हेगार रामेश्वर जंगल्या भोसले औरंगपुरा भागात चोरीचा मुद्देमाल विकण्यासाठी आला असता गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला. भोसलेने सिंधी सिरसगाव येथे केलेल्या दोन घरफोड्यांची कबुली देत ५ लाख ३० हजारांचा मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला आहे.

सिंधी सिरसगाव (ता. गंगापूर) येथील बाळू विनायक सोनवणे यांच्या घरातून भोसलेने २९ मे रोजी पहाटे लोखंडी पेट्या लांबवत ६ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल, तसेच त्यांच्या घराजवळील बाबासाहेब जगताप यांच्या घरातून ८० हजारांचा ऐवज पळवला होता. याप्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यात संशयित आरोपी रामेश्वर जंगल्या भोसले (वय २२, रा. पांडेगव्हाण गायरान, जि. बीड) याचा हात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांना मिळाली होती. या माहितीवरून औरंगपुरा येथे दुचाकीवर भोसले चोरीचा ऐवज विकण्यासाठी आला असता, त्याला पथकाने अटक केली.

ही कारवाई पोलिस आयुक्त संदीप पाटील, उपायुक्त प्रशांत स्वामी, एसीपी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप गुरमे, पीएसआय संदीप साळुंके, संजय मुळे, प्रकाश गायकवाड, बाळू लहरे, नवनाथ खांडेकर, अमोल शिंदे, सुनील बेलकर, श्याम आढे आणि तातेराव शिनगारे यांनी केली. दरम्यान, आरोपीला सोमवारी (ता. १७) न्यायालयात हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस. रामदीन यांनी बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. न्यायालयात सहायक सरकारी वकील समीर बेदरे यांनी युक्तिवाद केला.गणवेशासाठी तारीख पे तारीख!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण सुरूच! मात्र LPG गॅस टंचाईमुळे हे शेअर्स आजही तेजीत

Summer Skincare Home Remedies: चेहऱ्यावरची चमक हरवलीय? उन्हाळ्यात त्वचा उजळवण्यासाठी करा ‘हे’ 7 सोपे घरगुती उपाय

Rahul Dravid: ‘द वॉल' राहुल द्रविड यांना जीवनगौरव पुरस्कार; बीसीसीआयच्या वार्षिक सोहळ्यात विश्वविजेत्या संघांचाही गौरव होणार

Shivaji University : ठरलं! शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीचा क्लायमॅक्स जवळ; पाहा मुलाखतीसाठी कुणा-कुणाची नावे शॉर्टलिस्ट? 115 अर्ज, पण संधी फक्त 25 जणांना

LPG Price Hike:सिलिंडरच्या दरवाढीमुळे सामान्यांना फटका! घरगुती सिलिंडर ६० तर व्यावसायिक सिलिंडर ११४ रुपयांनी महाग; आर्थिक गणित बिघडलं..

SCROLL FOR NEXT