Ajit Pawar sakal
मराठवाडा

Ajit Pawar : शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा ध्वज अटकेपार फडकावण्यात होळकर घराण्याचा फार मोठा वाटा

गंगापूरात अहिल्याबाई होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे थाटात अनावरण.

सकाळ वृत्तसेवा

गंगापूर - पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर अत्यंत पराक्रमी न्यायी आणि तत्वशील राजमाता होत्या. होळकर घराण्याने शिवरायांच्या रायतेच्या राज्याचा वसा सोडला नाही. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा ध्वज अटकेपार फडकावण्यात होळकर घराण्याचा फार मोठा वाटा होता. आशा पराक्रमी इतिहासाला आपण उत्तरदायी असणं गरजेचे आहे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

शुक्रवारी (ता. २३) राजे यशवंतराव होळकर प्रतिष्ठानतर्फे शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे १३ वे वंशज भूषणसिंहराजे होळकर, आमदार सतीश चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष संजय जाधव, संतोष अंबिलवादे, राजे यशवंतराव होळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब तोगे, माजी नगराध्यक्ष फैसल चाऊस, सुरेश नेमाडे, योगेश पाटील, सोपान देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश निचीत, माजी सभापती अरुण रोडगे, ज्ञानेश्वर दुधारे, नंदकुमार कुकलारे, अशोक करडे, सोन्याबापु गायके, अशोक पारदे, संतोष पवार, सागर काटकर आदींसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुतळा उभारण्यासाठी आमदार सतीश चव्हाण यांनी नगरविकास विभागाच्या 'वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत' 30 लक्ष तर आमदार स्थानिक विकास निधीतून 10 असा एकूण 40 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता.

प्रारंभी (स्व.) माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आमदार (स्व.) राजेंद्र पाटणी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक पृथ्वीराज तोगे यांनी केले. पुढे बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, पाणीपतच्या लढाईनंतर मराठी सैन्य दक्षिणेला सैरावैरा धावत सुटलं, ना निवारा ना पाणी अहिल्यादेवींच्या ही बाब लक्षात आली.

नंतर त्यांनी ठिकठिकाणी घाट, बाराव धर्मशाळा, अनेक मंदिरांचा देशभर जीर्णोद्धार केला. अनेक नवीन मंदिरे बांधली. त्यांच्या परोपकारी कामांमुळे त्या संत पदाला पोचल्या. पुण्यश्लोक झाल्या. ही गोष्ट नवीन पिढीने कदापी विसरता काम नये. भूषणसिंहराजे होळकर म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांची व्यस्थापन कौशल्य, सैन्य व्यवस्थापन, मानवतावादी विचार आणि कुटुंबाकडे असणार लक्ष या गोष्टी आजच्या राज्यकर्त्यांनी घेण्यासारख्या आहेत.

राजे नवसाजी नाईक यांनी इंग्रजा विरुद्ध लढा दिला. पण अशा शूरविराच नाव कोठेही इतिहासात नाही. इसापूर धरणाला त्यांचं नाव देण्याची मागणी यावेळी राजेंनी केली. आमदार सतीश चव्हाण यांनी भरगोस निधि दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री पवार यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान इंगळे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT