file photo
file photo 
मराठवाडा

अभद्र वर्तन आले अंगलट, दोन वर्षाची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : बालिकेचा विनयभंग करणाऱ्या एका २५ वर्षीय युवकाला येथील अतिरिक्त सहजिल्हा व सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांनी दोन वेगवेगळ्या कलमान्वये शुक्रवारी (ता. १७) सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये रोख दंडाची शिक्षा सुनावली.

अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ता. २३ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी दहा वाजता त्या घरातील पती- पत्नी कामावर गेले. रोजमजुरी करणारे हे दाम्पत्य आपल्या घरी परतले. आईवडील घरी आल्यानंतर आठ वर्षीय बालिका रडत होती. हा प्रकार तिने पालकांना सांगितला. आम्ही शाळा सुटल्यानंतर आपले शाळेचे दप्तर घरी ठेवले. त्यानंतर आम्ही आपल्या नातेवाईकांकडे गेलो. तेथून परत येत असताना सायंकाळी पाच वाजता रस्त्यात सिध्दार्थ उर्फ सिध्दू केशव कसबे (वय २५) हा भेटला आणि त्याने माझ्यासोबत अभद्र वर्तन केले. यावेळी त्या बालिकेचा दहा वर्षाचा भाऊसुध्दा तिच्या सोबत होता.  

अखेर या प्रकरणात गुन्हा दाखल 

ही घटना तिने ता. २७ फेब्रुवारी २०१७ रोजी आपल्या नवऱ्याला विश्‍वासात घेऊन तयांनी या प्रकरणात तक्रार देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या दोघांनी अल्पवयीन बालिकेला आणि तिच्या अल्पवयीन भावाला सोबत घेवून अर्धापूरचे पोलीस ठाणे गाठले. तेथे दिलेल्या तक्रारीनुसार अर्धापूर पोलिसांनी भारतीय विधानाची कलम ३५४ (ए) आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कलम १२ यानुसार गुन्हा नोंदविला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबक गायकवाड यांच्याकडे देण्यात आला.

न्यायाधीश अशोक धामेचा निकाल 

या प्रकरणातील आरोप असलेला युवक सिध्दार्थ कसबेला अटक करुन तपास झाल्यावर त्र्यंबक गायकवाड यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयाच्या प्रक्रियेत सात जणांनी आपले जबाब न्यायालयासमक्ष नोंदविले. उपलब्ध पुराव्याआधारे न्यायाधीश धामेचा यांनी विशेष सत्र खटला क्र.६३/२०१७ मध्ये सिध्दार्थ कसबेला कलम ३५४ (अ) प्रमाणे एक वर्ष सक्तमजुरी आणि एक हजार रुपये रोख दंड तसेच पोस्को कायद्याच्या कलम १२ प्रमाणे एक वर्ष सक्तमजुरी आणि एक हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. दोन्ही कलमांमध्ये देण्यात आलेला दंड न भरल्यास सिध्दार्थ कसबेला तीन महिने अतिरिक्त सक्तमजुरीचा कारावास देण्यात येईल असे निर्णयात लिहिले आहे. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू ॲड. एम. ए. बत्तुल्ला (डांगे) यांनी मांडली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: कर्नाटकात 28 जागांपैकी आम्ही 25 जागा जिंकणार- बीएस येडियुरप्पा

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

SCROLL FOR NEXT