Photos : चित्रकारांनी कुंचल्यातून साकारली चालुक्यन शिल्पकला : कुठे ते वाचलेच पाहिजे

प्रमोद चौधरी
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

कला, भक्‍ती व  संस्‍कृतीचा  संगम  हा होट्टल महोत्‍सव  असून यात  सर्वांनी  सहभागी व्‍हावे,  सांस्‍कृतिक कार्यक्रमांचा आस्‍वाद घ्‍यावा. चालुक्‍यन शिल्‍पकला पहावी  व  आपली  संस्‍कृती संवर्धित करावी यासाठी महोत्सव घेतला जातो.

नांदेड :  जिल्‍ह्यातील ऐतिहासिक  वारसा लाभलेले  व चालुक्‍यांची  उपराजधानी म्‍हणून पुरातन काळात नावारूपाला आलेले  ग्राम म्‍हणून होट्टलची ख्‍याती आहे. होट्टल येथे सिध्‍देश्‍वराचे प्राचीन चालुक्‍य मंदीर स्थित असून सभोवती अनेक प्राचिन मंदिरे आहेत. प्राचिन शिल्‍प स्‍थापत्‍य कलेचा  समृध्‍द वारसा जतन, संवर्धन करणे पर्यटन वाढीच्‍या दृष्‍टीने आवश्‍यक आहे. त्‍याअनुषंगाने जनजागृती करणे, पर्यटकांना तसेच महाराष्‍ट्रातील लोकांना या ऐतिहासिक व प्रेक्षणिय स्‍थळांची माहिती होणे आवश्‍यक आहे.

कला आविष्‍कारांचा भाग लक्षवेधी 

Image may contain: 1 person, outdoor
Caption

होट्टल येथे प्रत्‍यक्ष ऐतिहासिक पुरावा म्‍हणून एक हजार वर्षा पूर्वीचे संस्‍कृत भाषेतील मराठी,  कानडी  लिपितील चार शिलालेख  आहेत.  शारदाभुवन शिक्षण संस्‍थेने प्रकाशित  केलेल्‍या “इन्सिक्रीप्‍शन ऑफ  नांदेड डिस्ट्रिक्‍ट” या ग्रंथात त्‍यांचा  समावेश आहे.  चार प्राचीन वास्‍तूच्‍या शिवाय मुर्ती आविष्‍काराचा अप्रतिम संग्रह येथे पहायला मिळतो.

नर्तकींच्या मनमोहक मूर्त्या 

Image may contain: 3 people, people standing and indoor
मनमोहक नर्तिकाची मूर्ती

मुर्ती आविष्‍कारात अप्रतिम नृत्‍य आविष्‍कार दर्शविणा-या नर्तकीच्‍या  मनमोहक मुर्ती, प्राचीन काळात  वापरलेल्‍या वाद्यांचा अप्रतिम आविष्‍कार इथे दिसतो. मृदंग, वीणा, इतर वाद्ये लक्षणीय आहेत. मुर्तीच्‍या रेखाटनातील तालबध्‍दता, आकार, गतीशिलता, कमनियता उल्‍लेखनिय आहे. वेषभूषा, केशभूषा, अलंकार मन वेधून घेतात. हा शिल्‍पाविष्‍कार मंदिरांच्‍या अंगोपांगावर घडलेला असला तरी त्‍यात धर्मश्रध्‍देबरोबरच धर्मापेक्षा जास्‍त कला आविष्‍कारांचा भाग अधिक लक्षणिय  आहे. 

पेंटींग कॅम्पमध्ये चित्रकार झाले दंग                                                          हा प्राचिन वारसा जोपासण्यासाठी इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अॅण्ड कल्चरल हेरीटेज या शाखेने शुक्रवारी (ता.१७ जानेवारी २०२०) होट्टल महोत्सवात  दोन दिवसीय पेंटींग कॅम्प सुरु केला. यात दिग्गज चित्रकार सहभागी होऊन चालुक्यन शिल्पकला आपल्या कुंचल्यातून रेखाटण्यात दंग झाले आहेत. 

Image may contain: one or more people
Caption

Image may contain: one or more people, people sitting and outdoor
Caption

 

Image may contain: one or more people and outdoor
Caption

Image may contain: one or more people, people standing and outdoor
Caption

 

Image may contain: one or more people and outdoor
Caption

Image may contain: one or more people and outdoor
Caption

 

Image may contain: one or more people, people sitting and outdoor
Caption

Image may contain: one or more people and people sitting
Caption

 

Image may contain: one or more people
Caption

Image may contain: one or more people and people sitting
Caption

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Artist draw Chalukyan Style Paintings : where to read it