file photo 
मराठवाडा

रेड झोनमधील व्यक्तींना ‘या’ जिल्ह्यात ‘नो एन्ट्री’

सकाळ वृत्तसेवा

परभणी : मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद, सोलापूर आणि इतर रेड झोनमधील व्यक्तींना परभणी जिल्ह्यात परवानगी दिली जाणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सोमवारी (ता. चार) सायंकाळी दिली.
लॉकडाउनच्या काळात विविध जिल्ह्यांत अडकलेले कामगार, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्तींना स्वजिल्ह्यात पाठविण्याबाबतच्या सूचना केंद्र व राज्य शासनाने दिल्या आहेत. मात्र, रेड झोनमधील व्यक्तींना जिल्हा प्रशासनाने प्रवेश करण्यास परवानगी नाकारली आहे. याउपरही अनधिकृतपणे प्रवेश केल्याचे दिसून आल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील.  संबंधितांना १४ दिवस संस्थात्मक विलगीकरण करण्यात येईल. त्यामुळे इतर राज्यात व जिल्ह्यात अडकलेल्या व्यक्तींसाठी परभणी येथून वाहन पाठवून घेऊन येण्याबाबतचे अर्ज करण्यात येऊ नयेत, ते अर्ज रद्द करण्यात येतील. परवानगी दिलेल्यांना सुद्धा १४ दिवस निवारागृहात ठेवण्यात येईल व त्यानंतर वैद्यकीय तपासणी झाल्यानंतरच घरी पाठविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांनी जाहीर केला आहे.

हेही वाचा : ‘हरित रामपुरी’साठी सरसावली तरुणाई

हेही वाचा ....

कोट्यातून परतलेल्या मुलांचे स्वॅब निगेटिव्ह

परभणी : आयआयटी कोचिंग क्लासेसच्या निमित्ताने कोटा (राजस्थान) येथे गेलेले विद्यार्थी परतले आहेत. त्यांचे स्वब अहवाल सोमवारी (ता. चार ) प्राप्त झाले. हे सर्व निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
 दोन दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने परिवहन महामंडळाच्या दोन बसेस पाठवून या विद्यार्थ्यंना परत आणले. त्यांना येथील हॉटेल्समध्ये थांबविले होते. त्यांच्या वैद्यकीय तपासणीसह त्यांचे स्वॅब नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळेकडे स्वॅब पाठविले होते. त्यांचे अहवाल सोमवारी दुपारी जिल्हा शासकीय रुग्णालयास प्राप्त झाले. ७७ पैकी ७६ मुलांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एकाचा अहवाल प्रलंबित आहे. यात मुलांसमवेत राहणाऱ्या काही पालकांचाही समावेश आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ते अहवाल आल्यानंतर सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Arya Encounter: 'बाथरुम'मधून पोलिस आत शिरले अन्.., कसा घडला किडनॅपरच्या एन्काऊंटरचा थरार?

IND A vs SA A 1st Test: विराटची कसोटीतील जागा रिषभ पंतला मिळाली? फोटोमुळे चर्चा; मुंबईच्या गोलंदाजाने गाजवला पहिला दिवस

Latest Marathi News Live Update : रोहित आर्या एन्काऊंटर प्रकरणाचा तपास आता मुंबई क्राईम ब्रांचकडे

IND vs AUS Semi Final : २२ वर्षीय Phoebe Litchfield भारी पडली; पेरी, गार्डनर यांची तुफानी खेळी, भारतासमोर ३००+ धावांचे लक्ष्य

Powai Kidnapper Encounter: पवई प्रकरणातील किडनॅपरचा एन्काऊंटर! छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली अन्..

SCROLL FOR NEXT