शेंगदाण्याच्या दुकानात नोकरी ते मिलचे बनले मालक Sakal
मराठवाडा

Success Story : शेंगदाण्याच्या दुकानात नोकरी ते मिलचे बनले मालक

लातूरच्या दहावी नापास राजकुमार शिंदे यांची उद्योग क्षेत्रात उत्तुंग भरारी

सकाळ वृत्तसेवा

Latur News : दहावी, बारावी नापास झाले की मुले खचून जातात, नैराश्यात जातात. काही जण तर आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतात. पण, दहावी-बारावीची परीक्षा म्हणजेच जीवन नाही. जिद्द, मेहनत संघर्ष करायची तयारी असेल, तर कोणत्याही क्षेत्रात गगनभरारी घेता येते. याचे चांगले उदाहरण लातुरातील राजकुमार हरिश्चंद्र शिंदे हे उद्योजक.

दहावी नापास झाल्यानंतर शिंदे यांनी शेंगदाण्याच्या दुकानात नोकरी केली अन् मोठ्या मिलचे स्वप्न पाहिले. त्यासाठी संघर्ष केला. हे स्वप्न सत्यात उतरवले. आज ते एका मोठ्या मिलचे मालक आहेत.

गांजूर (ता. चाकूर) सारख्या खेडेगावात राजकुमार शिंदे यांनी सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे ते शिक्षणासाठी लातूरला आले. पण, शिक्षणात त्यांचे मन कधी रमलेच नाही. शाळा सुटली की घरात एकदाचे दप्तर टाकले, की निघाले बाहेर खेळायला. असाच त्यांचा दिनक्रम असायचा. त्यांची पुस्तकाशी कधीच मैत्री झाली नाही.

पंधरा मिनिटे जरी पुस्तक हातात घेतली, की झोप यायची. डोक्यात काहीच शिरायचे नाही. यासाठी त्यांनी वडिलांचा अनेकवेळा मारही खाल्ला. अशावेळी दप्तर शोधण्यासाठी त्यांचा बराच वेळ जायचा. याचा परिणाम दहावीच्या निकालात दिसून आला.

ते नापास झाले. सर्वांनाच प्रश्न पडावा तसाच ‘पुढे काय’ असा प्रश्न त्यांना पडला. कुटुंबातील सदस्य, बाहेरच्या शिव्यादेखील त्यांना खाव्या लागल्या. पुस्तकात मन रमत नसेल तर नोकरी का करत नाहीस, असे सल्लेही त्यांना मिळू लागले.

हळूहळू त्यांना हे पटले आणि त्यांचा उद्योगाकडे प्रवास सुरू झाला. एका शेंगदाण्याच्या दुकानात त्यांनी नोकरी सुरू केली. २५० रुपये महिना पगार मिळायचा. चार वर्षे नोकरी केली, अनुभव घेतला. वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी साडेतीन हजार रुपयांचे खेळते भांडवल घेऊन स्वतःचा शेंगदाणा तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला.

याकरिता त्यांनी बाजार समितीकडून खरेदीदाराचा परवाना काढला. दुसऱ्याच्या मिलवर शेंगा न्यायच्या. मिलवाल्याला दोन रुपये व टरफल द्यायचे. शेंगा फोडायच्या आणि विक्री करायच्या असा हा त्यांचा व्यवसाय सुरू झाला. यासाठी भाड्याच्या सायकलचा वापर केला. दिवसा भाडे जास्त असायचे. त्यामुळे रात्री आठ ते सकाळी आठ अशी सायकल ते भाड्याने घेत.

या दोन दिवसांचे भागायचे. दहा वर्षे असा व्यवसाय केला. त्यानंतर दोन वर्षांसाठी एक मिल त्यांनी भाड्याने घेतली. त्यातून व्यवसाय केला. त्यानंतर सारोळा रस्त्यावर स्वतःची जागा घेत मिल टाकली. यातून उद्योगात प्रगती साधली.

आज एमआयडीसीमध्ये दररोज चारशे पोते शेंगदाणे तयार करण्याच्या मोठ्या मिलचे ते मालक आहेत. महाराष्ट्रासोबतच कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात अशा राज्यांतून ते शेंगा खरेदी करून शेंगदाणे सर्वत्र पाठवितात. दहावीत नापास असतानाही उद्योग क्षेत्रात त्यांनी घेतलेली भरारी इतरांना प्रेरणादायी ठरणारी आहे.

आईच्या नावाने ब्रॅण्ड

उद्योजक बनलेले राजकुमार शिंदे यांचे कुटुंबावर अत्यंत प्रेम आहे. विशेषतः आईवर अधिक आहे. शेंगदाणा उद्योगावरच ते थांबले नाहीत, तर घाण्याच्या तेलाचा उद्योगही त्यांनी सुरू केला आहे. या तेलाच्या ब्रॅण्डला त्यांनी आपल्या आईचे ‘विमल’ हे नाव दिले आहे. लातूरसोबतच त्यांनी पुण्यात रावेत भागातही आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed: गरोदर महिलेच्या पोटात ३० तास मृत बाळ; उपचारासाठी चालढकल, बीडमध्ये गंभीर प्रकार

India Pakistan Cricket Match: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या 'त्या' नववधुने केलं मोठं विधान!

Pro Kabaddi 12: पवन सेहरावतची हकालपट्टी! तमिळ थलायवाजने कर्णधाराला घरी पाठवण्याचं दिलं स्पष्टीकरण

Asia Cup 2025: बीसीसीआय भारत-पाकिस्तान सामना रद्द करू शकतं का? नेमका नियम काय आहे? वाचा...

Latest Marathi News Updates: मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांच्या नावे अज्ञाताकडून संभाजीनगरमध्ये होर्डिंग

SCROLL FOR NEXT