images.jpg 
मराठवाडा

विमा कंपनीने केले ‘याकडे’ दुर्लक्ष

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : जिल्ह्यात ‘क्यार’ व ‘महा’चक्री वादळाच्या तडाख्याने उद्‍भवलेल्या अतिवृष्टीत खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या वेळी कृषी, महसूल, जिल्हा परिषद व विमा कंपनीच्या प्रतिनिधींकडून संयुक्त पंचनामा करुन विमा भरलेल्या चार लाख ६० हजार ६९० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाने विमा कंपनीला सादर केला होता. परंतु विमा कंपनीने या नुकसानीची दखल घेतली नसल्याने विमा मंजूरीत तफावत दिसुन येत आहे. यामुळे सोयाबीन उत्पादकांना दुहेरी नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे.

सहा लाख ४८ हजार हेक्टरचे नुकसान 
‘क्यार’ व ‘महा’चक्री वादळामुळे जिल्ह्यातील कोरडवाहू, बागायती व बहुवार्षिक अशा एकूण सहा लाख ४८ हजार ३१६ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले होते. यात बाधित सात लाख १८ हजार ४३६ शेतकऱ्यांना फटका बसला होता. शासनाकडून विमा कंपनीचा प्रतिनिधी, कृषी सहायक, ग्रामसेवक तसेच तलाठ्यांना संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. यानुसार करण्यात आलेल्या संयुक्त पंचनाम्यात जिल्ह्यातील सात लाख ७३ हजार २१३ शेतकऱ्यांच्या सोयाबीन, तूर, कापूस व ज्वारी असे एकूण सहा लाख ६० हजार ६९० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल विमा कंपनीला कृषी विभागाने पाठविला आहे. 

सोयाबीनचे सर्वाधीक नुकसान
अतिवृष्टीत सोयाबीनचे तीन लाख ९२ हजार ३८८ हेक्टर, तूर आठ हजार २८ हेक्टर, कापूस ३९ हजार ३२६ हेक्टर, तर ज्वारी २० हजार ९४७ हेक्टरचा समावेश आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी कृषी विभागाने हा अहवाल सादर केला होता. परंतु कंपनीने मात्र या अहवालाकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसुन येत आहे. 

विमा मंजूरीत तफावत
जिल्ह्यातील सोयाबीनच्या विमा मंजूरीत मोठ्या प्रमाणात तफावत आली आहे. पावसातील अंतर तसेच अतिवृष्टीमुळे सोयाबीन तसेच कापुस उत्पादकांचे नुकसान अधिक झाले होते. याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी नुकसानीबाबत अहवाल पाठविला होता. परंतु याकडे कंपनीने फारसे गांर्भीयाने घेतले नसल्याने अनेक मंडळात शेतकऱ्यांना विमा कमी मिळाला आहे. 

खरीपात ३१३ कोटींचा विमा मंजूर
खरीप हंगाम २०१९ - २०२० मध्ये जिल्ह्यात पाच पिकांसाठी १२ लाख पाच हजार ३५ अर्जदारांनी सहभाग घेऊन विमा हप्त्यापोटी ४९ कोटी ९५ लाख रुपयांचा विमा हप्ता भरला होता. या विमा हप्त्यातून पाच लाख ८७ हजार ७७ हेक्टरवरील पिकांसाठी पीकविमा भरला. यातून दोन हजार २४२ कोटी ६१ लाख ४६ हजार ३४१ रुपये विमा संरक्षित रक्कम निश्चित केली होती. यापैकी सोयाबीन, ज्वारी व उडीद या पिकांसाठी पीकविमा भरलेल्या सहा लाख तीस हजार ९५७ शेतकऱ्यांना ३१३ कोटी ६९ लाख रुपयांचा विमा परतावा कंपनीने नुकताच मंजूर केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT