Aurangabad
Aurangabad 
मराठवाडा

आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट फेस्टिव्हलला प्रारंभ 

अनिल जमधडे

औरंगाबाद : तिसऱ्या 'आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट फेस्टिव्हल फॉर सोशल ऍण्ड कल्चरल रिलेशनशिप 2018' ला रविवारी (ता. चार) सकाळी आठ वाजता प्रारंभ झाला. 

जगप्रसिद्ध वेरुळ व अजिंठा लेण्या आणि मराठवाड्याला लाभलेला ऐतिहासिक वारसा जागतिक पातळीवर नेण्याच्या उद्देशाने धम्मयान एज्युकेशनल ऍण्ड चॅरिटेबल ट्रस्टतर्फे संयोजक भिक्‍खू एम. धम्मज्योती थेरो यांनी या बुद्धिस्ट फेस्टिव्हल आयोजीत केला आहे. ""बुद्ध धम्म तत्त्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करून मैत्री भावाचा जागतिक शांततेचा संदेश देणे हा फेस्टिव्हलचा उद्देश आहे.

फेस्टिव्हलला सकाळी नऊ वाजता धम्मध्वजारोहण करुन सुरवात झाली. त्यानंतर भिक्‍खू संघाच्या बुद्धवंदना आणि परित्राणपाठाने कार्यक्रम घेण्यात आले. दुपारी दिड वाजता तिबेटचे भिक्‍खू पूज्य खेंसूर रिंपोचे जांगचूप यांच्या हस्ते उद्‌घाटन होईल. तर सायंकाळी पाच वाजता समारोप होत असून, यावेळी केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे समाज कल्याणमंत्री राजकुमार बडोले, महिला व बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, अशोक वांगडी यांच्यासह देशविदेशातील भिक्‍खू संघ उपस्थिती राहणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: स्टार्कने दिल्लीला दिला दुसरा मोठा धक्का! धोकादायक फ्रेझर-मॅकगर्कला धाडलं माघारी

SCROLL FOR NEXT