मराठवाडा

मराठवाड्यातील पिकांना पावसाच्या अनियमिततेचा फटका

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - कधी सुलतानी तर आसमानी संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा पावसाच्या अनियमिततेचा मोठा फटका बसणार असून मराठवाड्यातील विविध पीकांच्या उत्पादनात 30 ते 32 टक्‍यापर्यंत घट होण्याची शक्‍यता आहे. मोठ्या कालावधीनंतर दाखल झालेल्या पावसाने तारले असले तरी उत्पादनात घट होणार आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील 263 गावामधील पीके बाधीत झाले आहेत. 

विभागातील परिस्थितीबाबतचा अहवाल कृषी विभागाने विभागीय आयुक्‍तालयास सादर केला आहे. त्यानुसार विभागात 779 मि.मि. वार्षीक सरासरीच्या तुलनेत आत्तापर्यंत 541 मि.मि. पाऊस पडणे अपेक्षीत असताना केवळ 472 मि.मि. पाऊस झाल्याची नोंद आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक मंडळात सरासरीच्या 50 टक्‍क्‍यापेक्षा कमी पाऊस झालेला आहे. 

फुलंब्री तालुक्‍यातील पिरबावडा मंडळात 6 गावांमध्ये पाचशे हेक्‍टर मका हे पिक बाधीत झाले असून अन्य ठिकाणीही कापूस, मका यात 20 ते 25 टक्‍के घट होईल. पैठण तालुक्‍यातील लोहगाव, बालानगर, बिडकीन, ढोरकीन मंडळातील 11 गावांमधील पीके बाधीत झाले आहेत. गंगापुर तालुक्‍यात तुर, कापुस मका 50 तर मुग 70 ते 80 टक्‍के घट होण्याची शक्‍यता आहे. सिल्लोड तालुक्‍यात पेरणीचे प्रमाण कमी असून 14 गावातील पिके बाधीत झाले आहेत. कन्नड तालुक्‍यातील 5 गावातील, खुलताबाद तालुक्‍यातील सुलतानपुर व वेरूळ मंडळातील 22 गावातील मका पिकांवर परिणाम झाला आहे. वैजापूर तालुक्‍यात 137 गावांमध्ये पिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्‍यता नसल्याने कापुस, मका, बाजरी, मुग, उडीद, भुईमुग, सोयाबीन अशा 4 हजार 48 हेक्‍टर क्षेत्रातील पिके पावसाअभावी बाधीत झाले आहेत. पीक परिस्थितीत सुधारणा झाली तरी कापुस व मका या पिक उत्पादना 50 टक्‍के घट होइल, अशी शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. 

बीड जिल्ह्यात 18 जुलैपासून 29 दिवसाचा खंड पडला होता. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद व बीड जिल्ह्यात कापसावर बोंडअळी, मावा तर लातूर जिल्ह्यात भुरी रोगाचा, उस्मानाबाद जिल्ह्यात मावा किडीचा, भुरी रोगाचा, नांदेड जिल्ह्यात पिकास पाणी लागून पिके पिवळी पडली आहेत. 

मराठवाड्यातील पीक लागवड हेक्‍टरमध्ये
कापस : 15 लाख 17 हजार 
तुर : 4 लाख 46 हजार 
मुग : 1 लाख 67 हजार 
उडीद : 1 लाख 48 हजार 
सोयाबीन : 17 लाख 91 हजार 
बाजरी : 1 लाख 6 हजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

Latest Marathi News Live Update : कल्याणमधून श्रीकांत शिंदे अर्ज भरणार, जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT