Irrigation Scheme 521 beneficial farmers get 1 crore 65 lakh fund beed sakal
मराठवाडा

Irrigation Scheme : ५२१ लाभार्थींना मिळणार एक कोटी ६५ लाख

सूक्ष्म सिंचन योजना; आठ वर्षांपासूनचे थकीत अनुदान

सकाळ वृत्तसेवा

बीड : तांत्रिक चुकीमुळे मागील आठ वर्षांपासून अनुदानापासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील ५२१ लाभार्थ्यांना सूक्ष्म सिंचन योजनेतील अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या अनुदानासाठी राज्य शासनाने एक कोटी ६५ लाख रुपये वर्ग केले आहेत.

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २०१३ - १४ आणि २०१४ - १५ या आर्थिक वर्षांमध्ये सूक्ष्म सिंचन योजनेसाठी कृषी विभागाची पूर्वसंमती घेतली होती. मात्र नंतरच्या काळात तांत्रिक अडचणींमुळे सदर शेतकऱ्यांचे अनुदान रखडले होते.

सारी यंत्रणा ऑनलाइन झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या बाबतीत ‘सबसिडी फिक्सींग’ अशी अडचण दाखविली जात होती. त्यामुळे जिल्ह्यातील ५२१ शेतकऱ्यांना आपले हक्काचे अनुदान मिळाले नव्हते. अखेर आता याबाबतीत या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.

तसा शासन आदेश निर्गमित करण्यात आला असून त्या अनुदानासाठी एक कोटी ६५ लाखाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे मागील आठ वर्षांपासून अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT