ग्रामपंचायत sakal
मराठवाडा

Jalna : संपादित केलेल्या जागेवर शेततळे उभारल्याने सरपंच अपात्र; जिल्हाधिकाऱ्याची कारवाई

अर्जदारांच्या वतीने ॲड. राजेश वाघ व ॲड. श्रीराम हुसे यांनी बाजू मांडली.

सकाळ वृत्तसेवा

जालना : पाझर तलावासाठी संपादित केलेल्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून शेततळे उभारल्या प्रकरणी चित्तोडा ( ता. बदनापूर) येथील सरपंच ज्ञानेश्वर डिघे यांचे सरपंचपद जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले आहे.

सुभाष डिघे यांनी वर्ष २०२१ मध्ये ॲड. आर .एस .वाघ यांच्यामार्फत या प्रकरणी विवाद अर्ज दाखल केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन सरपंचांना अनर्ह केले होते. या निर्णयाविरुद्ध सरपंचांनी विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले. जलसंधारण अधिकारी यांच्या अहवालात पाझर तलावाच्या लगत शेततळे असून सरपंचांचे नाव नसल्याने संदिग्धता दिसून आली. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश रद्द करून फेर सुनावणी घेण्याचे निर्देश दिले होते.

त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर बदनापूर तहसीलदार व जलसंधारण अधिकारी यांनी स्थळ पाहणी करून केलेल्या अहवालात चित्तोडा ता. बदनापूर येथील पाझर तलावामध्ये ज्ञानेश्वर डिघे यांची ०.६७ आर. शेतजमीन संपादीत झाली होती.

या जमिनीवर ज्ञानेश्वर डिघे यांनी अतिक्रमण करून शेततळे खोदले असे सिद्ध झाले. परिणामी जिल्हाधिकाऱ्यांनी सुभाष डिघे यांचा अर्ज मंजूर करत ज्ञानेश्वर डिघे यांचे सदस्य व सरपंचपद पुढील काळासाठी अनर्ह ठरविले. अर्जदारांच्या वतीने ॲड. राजेश वाघ व ॲड. श्रीराम हुसे यांनी बाजू मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! विमानतळावरून १५ नवीन विमानांची उड्डाणे; कुठे आणि कधीपासून? जाणून घ्या...

Vaibhav Sooryavanshi ला भारतीय संघात पदार्पणाची संधी द्यायला हवी का? ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणतो, अरे त्या पोराला खेळू द्या...

Pune Crime : सासरच्या छळाला कंटाळून महिलेने संपविले जीवन; सासरे व दिराविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Water Supply News : शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी सुरळीत राहणार

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

SCROLL FOR NEXT