Jalna Crime News sakal
मराठवाडा

Jalna Crime News: जमिनीचा वाद! तोंडात चिखल टाकत, गळा आवळून सावत्र भावाचा खून

Jalna News: जमिनीच्या वादातून सावत्र भावने काढला काटा

सकाळ वृत्तसेवा

सुखापुरी : अंबड तालुक्यातील भारडी येथील जमिनीच्या वादातून सावत्र लहान भावाचा रुमालाने गळा आवळून व नाकातोंडात चिखल टाकून खून केल्याची घटना गुरुवारी) ता. 23) भारडी येथे घडली आहे. विराज तुकाराम कुडेकर ( वय आठ), असे मृत मुलाचे नाव आहे.

भारडी येथील तुकाराम कुडेकर यांची पहिली पत्नी ही काही कारणाने पतीला सोडून निघून गेली होती. त्यामुळे तुकाराम कुडेकर यांनी कावेरी हिच्या सोबत दुसरे लग्न केले. पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलगा ऋषिकेश (वय 18) हा आईसोबत छत्रपती संभाजीनगर येथे राहतो.

तर दुसरी पत्नी कावेरी हिच्यापासून झालेला विराज हा भारडी येथे आई-वडिलांसोबत राहत होता.

पहिल्या पत्नीचा पतीसोबत शेती वाटून घेण्यावरून कोर्टात वाद सुरू आहे. तसेच पहिल्या पत्नीचा मुलगा ऋषिकेश हा अधून मधून गावाकडे येत होता. शिवाय आईच्या सांगण्यावरून वडिलांना जमीन वाटून देण्याविषयी वाद घालत होता.

गुरुवारी (ता. 23) ऋषिकेशने आपल्या सावत्र लहान भाऊ विराजला गोड बोलून तुला चॉकलेट देतो, सांगून डाव्या कालव्याच्या बाजूच्या शेतात नेले.

तेथे त्यांनी रुमालाने विराज याचा गळा आवळला. शिवाय त्याने त्याच्या नाकात तोंडात चिखल कोंबला. यात विराज याचा श्वास कुदुमरून जागीच मृत्यू झाला. ऋषिकेशने खात्री केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला.(Marathi Tajya Batmya)

ही घटना काही तासानंतर गावामध्ये पसरल्याने विराज याच्या आईला माहिती पडल्यानंतर मृत विराज याची आई कावेरी तुकाराम कुडेकर यांनी गोंदी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ऋषिकेश व त्याची आई रेखा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.

दरम्यान मयत विराज याचे पार्थिव अंबड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास गोंदी पोलिस करत आहेत.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT