Jalna Crime sakal
मराठवाडा

Jalna Crime: तीर्थपुरीत सशस्त्र दरोडा; पती पत्नीला मारहाण करून ४० तोळे सोने लंपास

तीर्थपुरी येथील उल्हासराव पवार यांच्या घरी (खिडकीचा मळा) शुक्रवारी पहाटे दोन वाजता संशत्रदरोडा पडला

तुकाराम शिंदे

तीर्थपुरी : तीर्थपुरी येथील उल्हासराव पवार यांच्या घरी (खिडकीचा मळा) शुक्रवारी पहाटे दोन वाजता सशस्त्र दरोडा पडला असून पती पत्नीला मारहाण करून जवळपास ४० तोळे सोने लंपास केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले.

या विषयी अधिक माहिती अशी,की तीर्थपुरी येथील खिडकीचा मळा येथील उल्हासराव पवार यांच्या घरी शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजता सात ते आठ दरोडेखोरानी प्रवेश केला.घरात उल्हासराव पवार पती पत्नी झोपलेले असताना त्यांच्या घराच्या कडया दरोडेखोरानी लावल्या.कडी लावल्याचा आवाज आल्याने उल्हासराव पवार यांना जाग आली.

त्यानी बाजूच्या घरात झोपलेले त्यांचे लहान बंधू सुरेश पवार यांना आवाज दिला असता ते उठुन घराच्या बाहेर आले असता दरोडे खोरानी त्याना मारहाण करून पत्नीला मारहाण केली.पत्नीच्या हातातील सोन्याची बागडी व अंगठया असा इतर सोन्याचा ऐवज असा एकूण 40 तोळे सोने लंपास केले.दरोडेखोरानी बाजूच्या घराच्या कड्या लावल्या होत्या.त्याच्या घराच्या बाजूला शेत असल्याने याठिकानाहून दरोडेखोर आले असावे.

घरात जवळपास वीस मिनिटं चोरांनी धुमाकूळ घातला असून सुरेश एकनाथ पवार यांना मारहाण झाली असून त्यांच्या बोटाला जमख झाली.त्यांची पत्नी अनुराधा सुरेश पवार यांच्या डोक्यावर काठीचा मार लागला असून गालावर जखम झाली आहे.याघटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक लंके यांनी घटनास्थळी भेट देऊन वरीष्ठ पोलीस अधिकारी यांना माहिती दिली.या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे,गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी सुभाष भुंजग, श्री.महाजन,गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांनी भेट दिली.यावेळी फिंगर प्रिंट व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : भोंदू खरात प्रकरणानंतर राज्यभर कारवाईचा धडाका; महिन्यात 15 भोंदू बाबांवर गुन्हे दाखल, नाव-गावासह 'अंनिस'ने यादीच केली जाहीर

IPL 2026 : स्टार खेळाडूंसोबत शेवटचा'सेल्फी'! १४ वर्षीय अभव, २० वर्षीय क्रिकेटपटूचा जागीच मृत्यू; DC vs RCB सामन्यानंतर भयानक घडलं

ओबेन इलेक्ट्रिककडून Rs. 99,999 रूपये या सुरुवातीच्या किमतीत Rorr EVO सुपर बाइक लाँच; दमदार फीचर्स पाहा

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील खुपिरे येथील सुरभी लॉजवर पोलिसांचा छापा

MLC Election: झीशान सिद्दीकींच्या उमेदवारीमुळे वाद पेटला; एक बडा नेता शिवसेनेकडे वळला? तर दुसरा दुखावला, राष्ट्रवादीत बंडाची चाहूल!

SCROLL FOR NEXT