murder murder
मराठवाडा

Jalna|चाकू भोसकून महिलेचा खून, संशयिताचा आत्महत्याचा प्रयत्न

जालना शहरातील पोस्ट ऑफिस परिसरात नोकराने विवाहित महिलेचा चाकूने भोकसून खून केली.

उमेश वाघमारे

जालना : शहरातील पोस्ट ऑफिस परिसरात नोकराने विवाहित महिलेचा चाकूने भोकसून खून केल्याची घटना मंगळवारी (ता.१४) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली आहे. संगीता अलोकचंद लाहोटी (वय ६२) असे मृत महिलेचे नाव आहे. विशेष संशयित (Jalna) आरोपी भीमराव धांडे याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार लाहोटी व त्यांचा नोकर भीमराव धांडे यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला. त्यातून नोकर धांडे याने लाहोटी यांच्या निवासस्थानी दगडफेक केली. त्यानंतर या प्रकरणी लाहोटी हे सदर बाजार पोलिस ठाण्यात गेले. याची माहिती नोकर धांडे याला मिळाल्यानंतर त्याने लाहोटी यांच्या निवासस्थानी येऊन घरात एकटी असलेल्या संगीता लाहोटी यांच्यावर चाकूने वार करून खून केला. (Jalna Crime Servant Killed Woman, After Consumed Toxin)

ही घटना घडल्यानंतर त्याने स्वतः विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रर्यन्त केला. या घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच मृत महिलेचा मृतदेह उत्तरीय तापणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केला. तर विष प्राशन करणाऱ्या संशयित नोकर भीमराव धांडे याला ही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT