corona.jpg
corona.jpg 
मराठवाडा

Coronavirus : जालन्यात बाधितांचा आकडा एक हजार पार, आज ५१ रुग्णांची वाढ 

उमेश वाघमारे

जालना : मराठवाड्यात औरंगाबाद पाठोपाठ आता जालना जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना बाधित रूग्णांची संख्या झाली आहे. रविवारी (ता.१२) जालना जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ही एक हजार पार झाली आहे. परिणामी जालना जिल्ह्यातही कोरोनाचा विखळा अधिक घट होत असल्याचे चित्र आहे. 

जालना जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. रविवारी (ता.१२) सकाळी ५१ जणांचे कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. मधुकर राठोड यांनी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या ही तब्बल एक हजार ४२ वर जाऊन पोहचली आहे. यात सर्वाधिक रूग्ण हे जालना शहरातील आहेत. दरम्यान आतापर्यंत ३७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर ५९६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान कोरोनाचा विळखा कमी करण्यासाठी जालना शहरात ता. पाच जुलैच्या रात्री बारा वाजल्यापासून दहा दिवसांचे कडकडीत लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. मात्र, तरी देखील काही नागरिक या लॉकडाउनमध्येही घराबाहेर पडत असल्याचे चित्र मागील दोन ते तीन दिवसांपासून दिसून येत आहे. परिणामी आता कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी काय उपाय योजना कराव्यात असा प्रश्न प्रशासनासमोर उपस्थित होत आहे. 

कोरोना मीटर 
एकूण संख्या १०४२ 
बाधितांचा मृत्यू ३७ 
 कोरोनामुक्त  ५९६ 

संपादन : प्रताप अवचार 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT