मराठवाडा

महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना प्रेमी युगलास बेदम मारहाण

उमेश वाघमारे

जालना : जालना जिल्ह्यात राज्यात सुन्न करणारी घटना घडली आहे. तालुक्‍यातील गोंदेगाव शिवारात तीन ते चार तरुणांनी एका महाविद्यालयीन प्रेमीयुगलास जबर माहराण करत त्याचा व्हिडिओ तयार केल्याची घटना शुक्रवारी (ता.31) उघडकीस आली आहे. व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस मारहाण करणाऱ्यांचा शोध घेत आहे. 

दरम्यान ही घटना नेमकी कधी घडली हे अजून स्पष्ट नसून या प्रकरणी कोणीही पोलिसात कुणीही तक्रार दिलेली नाही. मात्र, सोशल मिडियावरील व्हायरल व्हिडिओ पोलिस अधीक्षक चैतन्य एस. यांना मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

जालना तालुक्‍यातील गोंदेगाव शिवारात काही दिवसांपूर्वी बुलडाणा जिल्ह्यातील एक महाविद्यालयीन प्रेमयुगल आले होते. यावेळी त्याच शिवारातील तीन ते चार तरुणांनी त्या प्रेमयुगलास मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. 

विनयभंग करत मारहाण केल्याचा व्हीडीओ होतोय व्हायरल 

मारहाणी दरम्यान या तरुणांनी व्हिडिओ तयार केला आहे. या व्हायलर व्हिडिओमध्ये एक तरुण पीडित मुलीच्या शर्टची कॉलरला धरून तिला ओढत असल्याचे दिसून येत आहे. या घटनेची तक्रार देण्यास प्रेमयुगल पुढे आले नाही. मात्र, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो पोलिस अधीक्षक चैतन्य एस यांच्या हाती पडला. त्यानंतर पोलिस अधीक्षक चैतन्य एस यांनी या व्हिडिओ मधील संशयित मारहाण करणाऱ्या तरुणांचा शोधासाठी पोलिसांचे पथक पाठविले आहे. तसेच काही संशयित निष्पन्न झाल्याचे ही पोलिसांची सांगण्यात आले आहे.

शोधासाठी पथक पाठविले 

प्रेमयुगलास मारहाणीच्या व्हिडिओसंदर्भात गोंदेगाव भागात पोलिसांचे पथक संशयितांच्या शोधासाठी पाठविले आहे. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल. जर पीडित मुलगी किंवा अन्य कोणी या प्रकरणी तक्रार देण्यास पुढे आले नाही, तर पोलिस प्रशासन स्वतः गुन्हा दाखल करेल अशी माहिती पोलिस अधिक्षक चैतन्य एस. यांनी "सकाळ' बोलतांना दिली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं अखेर पदार्पण झालं, पण कोणाला मिळाला संघातून डच्चू? पाहा भारत-इंग्लंडची Playing XI

Women Farmers Lead: भिवधानोरा गावातील शेतकरी महिलांची जलसंधारण, सेंद्रिय शेती व सामूहिक खरेदीत आदर्श कामगिरी; पाणी फाउंडेशन स्पर्धेत उठून दिसले योगदान

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

School Flooding: पहिल्याच पावसात अगरकानडगाव जि.प. शाळा जलमय; विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात, कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी शिरसाट यांची पाहणी

Mumbai Rain: पावसाने उघड केलं विकासाचं वास्तव! मुंबईत झाडं कोसळली, रस्ते वाहून गेले, मिसिंग लिंकवर खड्ड्यांचं साम्राज्य

SCROLL FOR NEXT