Teacher Recruitment sakal
मराठवाडा

Teacher Recruitment : सेवानिवृत्त शिक्षकांची भरती सुरू; १०१ जणांची निवड; ८५८ जागा रिक्त

जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ८५८ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. यात प्राथमिक शिक्षकांसह पदवीधर शिक्षकांचा समावेश आहे.

सकाळ वृत्तसेवा

जालना - जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ८५८ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. यात प्राथमिक शिक्षकांसह पदवीधर शिक्षकांचा समावेश आहे. या रिक्त जागांवर सेवानिवृत्त शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू झाली असून जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १०१ शिक्षकांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून अंतिम निर्णय या आठवड्यात होणार आहे.

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने घेण्यात आला होता. या निर्णयाला शिक्षक संघटनाकडून विरोधही झाला.

मात्र, शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषद शाळा व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांतील सेवानिवृत्त शिक्षकांमधून वीस हजार रुपये मानधनावर कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपाची सेवानिवृत्त शिक्षक भरती करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सुरू केली आहे. जिल्ह्यात ८५८ शिक्षकांचे पदे रिक्त आहेत. त्यानुसारही कंत्राटी भरती सुरू झाली आहे.

पहिल्या टप्प्यात १८७ सेवानिवृत्त शिक्षकांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यांपैकी कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी १२७ सेवानिवृत्त शिक्षकांना बोलविण्यात आले होते. त्यांपैकी १०४ सेवानिवृत्त शिक्षक कागदपत्र पडताळणीला उपस्थित राहिले. यात १०१ शिक्षकांची निवड शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे.

या निवड झालेल्या शिक्षकांना या आठवड्यात कंत्राटी तत्त्वावर तात्पुरती ऑर्डर मिळेल. त्यानंतर हे सेवानिवृत्त शिक्षक वीस हजार रुपये प्रतिमहिना या मानधनावर विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत. नियुक्ती देताना या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना शिकवणे, वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करून घेणे, शाळेतील सर्व उपक्रम राबविण्यासंदर्भात लेखी स्वरूपात हमीपत्र घेण्यात येणार आहे.(Latest Marathi News)

शासनाच्या निर्णयानुसार सेवानिवृत्त शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात १८७ सेवानिवृत्त शिक्षणांचे अर्ज आले आहे. त्यांपैकी १२७ सेवानिवृत्त शिक्षकांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवले होते. त्यांपैकी १०४ जण आले असून त्यातून १०१ सेवानिवृत्त शिक्षकांची निवड झाली आहे.

- कैलास दातखीळ, शिक्षणाधिकारी, जालना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त! RBIच्या मोठ्या निर्णयाआधी उलटफेर; जाणून घ्या आजचा ताजा भाव

९ पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावलेलं प्रकरण काय होतं? कोर्टाने का म्हटलं ‘दुर्मिळातील दुर्मिळ घटना’?

'या' ग्लॅमरस मराठी अभिनेत्रींचं दुसरं लग्न चर्चेत; एका अभिनेत्रीची प्रेमकहाणी आहे भन्नाट!

Nagpur Crime: नागपूर हादरलं! चप्पल अदलाबदलीच्या वादातून युवकाची हत्या... चार आरोपी अटकेत

Pune Tanker Accident : वानवडीत पाण्याच्या टँकरच्या धडकेत 24 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू; डोकं चाकाखाली चिरडलं, चालक स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर

SCROLL FOR NEXT