Jalna school palm oil bill  sakal
मराठवाडा

जालना : उधारीच्या गोडेतेलावर खिचडीला फोडणी

पहिल्याच दिवशी गुरुजींसमोर पोषण आहार बनविताना संकट

सुहास सदाव्रते

जालना : एकीकडे नवे शैक्षणिक वर्षाची सुरुवात तर दुसरीकडे गुरुजींसमोर नवाच पेच निर्माण झाला आहे. शासन आदेशात पहिल्या दिवशी पोषण आहार देण्याचे सांगितले खरे, परंतु खिचडीसाठी गोडेतेलाचा पुरवठा झालेला नाही. गुरुजींना उधारीवर तेल आणून खिचडी शिजवावी लागली, हे विशेष. यातही सदर तेलाचे बिल हे किमान चार चार महिने मिळत नसल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.

दोन वर्षाच्या विस्कळीत परिस्थितीनंतर नवे शैक्षणिक वर्षाला बुधवारी सुरुवात झाली. शिक्षण विभागाने प्रवेशोत्सवासह विशेष सूचना देत विद्यार्थ्याचे स्वागत करण्यात यावे,असे सांगितले. दुसरीकडे शालेय पोषण आहारात या वेळी गोडेतेल दिले नाही.सूचना देत पोषण आहारासाठी गोडेतेल मुख्याध्यापकांनी उधारीवर घ्यावे आणि पोषण आहार शिजवावा. अशा आदेशाने मुख्याध्यापक वर्ग त्रस्त झाल्याचे चित्र शाळांमधून दिसून येत आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी पोषण आहार करण्यासाठी विद्यार्थी संख्येनुसार ४०० ते ४ हजार रुपये एका दिवसाला खर्च झाला आहे. ज्या शाळेत विद्यार्थी संख्या ५०० पेक्षा अधिक आहे अशा शाळेत पोषण आहारासाठी गोडेतेल ३ हजार रुपये खर्च लागला असल्याचे मुख्याध्यापक सांगतात. मागील अनुभवानुसार किमान तीन चार महिने तेलाचे बिल निघत नाही.

जेव्हा निघते तेव्हा बिलाची रक्कम पाहून शालेय समिती आणि मुख्याध्यापक वर्गात वाद निर्माण होत असल्याचे मुख्याध्यापकांचे अनुभव आहेत. अशा अनुभवानुसार मुख्याध्यापकांना पोषण आहार कामापेक्षा अवांतर बाबीचे जास्त टेन्शन येते, असेही अनुभव मुख्याध्यापक सांगतात. मध्यंतरीच्या काळात इंधनाचे दर वाढल्याने साहजिकच गोडेतेल व इतर वस्तूचे भावही चांगलेच वाढले आहेत.

प्रलंबित बिलाची दरमहा डोकेदुखी

शालेय पोषण आहाराची बिले देताना विलंब होऊ नये.कारण प्रलंबित बिलाची रक्कम पाहता शालेय व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापक, शिक्षक यांच्यात नेहमीच वाद होतात,असे चित्र नेहमीच दिसून येते. शासनाने दरमहा भाजीपाला, तेल याचे पैसे द्यावेत, अशी मागणी मुख्याध्यापक वर्गातून होत आहे.

नवीन शैक्षणिक वर्ष सुरुवात झाली आहे.मुलांचे स्वागत, गणवेश यासह इतर उपक्रम घेत शाळा भरविली.दुसरीकडे पोषण आहारासाठी चारशे रुपयाचे गोडेतेल उधारीवर आणून खिचडी शिजविली.

- आर.आर.जोशी, केंद्रीय मुख्याध्यापक, काजळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT