diwali festival  sakal
मराठवाडा

Jalna : दिवाळीनिमित्त कापड बाजारात उत्साह

जालन्यातील चित्र, यंदा पंचवीस टक्के दरवाढ

सकाळ वृत्तसेवा

जालना : दिवाळीचा सण काही दिवसावर आला असून कापड बाजारात खरेदीसाठी नागरिकांची पसंती दिसून येत आहे. मागील वर्षापेक्षा यंदा ऐन हंगामात कपड्यांच्या किमतीत किमान वीस टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे व्यापारी सांगतात.

नवीन व जुना जालन्यातील कापड बाजारात दिवाळी सणाचा मोठा उत्साह दिसून येत आहे. शहरातील पन्नास पेक्षा अधिक होलसेल कपड्यांच्या दुकानात व्यावसायिक कापड खरेदीसाठी दिसून येत आहे. शहरातील कापड बाजार, शनिमंदिर चौक, सतकर कॉम्प्लेक्स परिसरातील रेडिमेड कपडे दुकानात खरेदीसाठी नागरिक दिसून येत आहे.

बाजारात महिलांच्या विविध फॅशनच्या साड्या,लहान मुलांचे रेडिमेड कपड्यांचा मोठी पसंती दिली जात आहे. मागील वर्षापेक्षा यंदा कापड बाजारात वीस टक्क्यांनी दरवाढ झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. कापड उद्योगात उत्पादन खर्च, कच्चा मालाचे वाढलेले दर यासह डिझेल पेट्रोलचे सतत वाढणाऱ्या दरामुळे वाहतूक खर्चात मोठी वाढ झाल्याने किमतीत वीस ते पंचवीस टक्के वाढ झालेली असल्याचे कापड व्यापारी सांगतात.

कापड बाजारात लहान मुलांचे रेडिमेड कपडे, मुलीच्या कपड्यात ‘गरारा, लाचा, प्लाझो ,ट्रेन्स अशा फॅशनचे कपड्यांना अधिक मागणी आहे. कपड्यात नेहरू शर्ट, कुर्ता पायजमा, यासह युवकांमध्ये ‘शॉर्ट कुर्ता’ फॅशन अधिक दिसून येत आहे.

विविध साड्यांचे दर

प्युअर सिल्क ३ ते ५ हजार

साऊथ पॅटर्न साडी २२०० ते ७ हजार

सॉफ्ट सिल्क साडी १५०० ते ४ हजार

कॉटन डिझायनर साडी१ हजार ते ६ हजार

होलसेल कापड येतो येथून

इचलकरंजी,सोलापूर येथे धोतर

उपरणे येतात आंध्रप्रदेश येथून

सूरत,इंदूर येथून विविध प्रकारच्या साड्या

अहमदाबाद, मुंबई, उल्हासनगर, इंदूर,तामिळनाडूतून रेडिमेड कपडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

टिटवाळ्यात गणपती विसर्जनावरुन दोन गटांत तुंबळ हाणामारी; भाजप-ठाकरे सेनेचे नेते, नगरसेवक भिडले, तणावाचं वातावरण

Shardul Thakur : चूक सांगण्यासाठी धावत आलेल्या शार्दूलचं रोहित शर्माने ऐकूनच घेतले नाही अन् मग...; Video

कसं झालं 'लस्ट- स्टोरीज ३' मधील सिद्धार्थ-अदिती राव हैदरीच्या इंटिमेट सीनचं शूटिंग? म्हणाला, 'दोघांमध्ये उशी...'

Marathi News Live Updates : राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Dudhganga Canal Project Update : 1995 पासून रखडलेला दूधगंगा डाव्या कालव्याचा प्रकल्प; 31 वर्षे लोटली तरी काम अपूर्णच, शेतकरी चिंतेत

SCROLL FOR NEXT