Crop Damage sakal
मराठवाडा

Jalna : शेतकऱ्यांच्या पीकविम्याकडे नजरा

आष्टी परिसरातील चित्र, रब्बी हंगाम तोंडावर

सकाळ वृत्तसेवा

आष्टी : पंतप्रधान पीकविमा योजना अंतर्गत परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी विमा भरला. परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसानही झाले. मात्र परिसरातील शेकडो पात्र शेतकरी अद्याप पीकविमा रक्कमेपासून वंचित राहिले आहेत. रब्बी हंगाम तोंडावर असल्याने पीकविम्याकडे सध्या शेतकऱ्यांच्या नजरा आहेत.

गेली दोन वर्ष शेतकरी कोरोना संकट, लॉकडाऊन, त्यातच निसर्गाचा लहरीपणा आणि अतिवृष्टी, बेमोसमी पाऊस या चक्रात अडकला आहे. दरम्यान, यंदाही पाऊस चांगला होईल या आशेने शेतकऱ्यांनी उत्साहाने खरीप पेरणी केली.मात्र अतिवृष्टी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरले.

परिसरात अतिवृष्टीमुळे तसेच परतीच्या पावसाने कपाशी,तूर, सोयाबीन, मूग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विशेष म्हणजे कपाशी व सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने निम्म्याहून अधिक उत्पादन हातचे गेले. या पार्श्वभूमीवर पीकविमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे. मागील आठवड्यात आष्टी येथील युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने परतूर उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे संबंधित कंपनीने काही शेतकऱ्यांचा पीकविमा मंजूर केला.

बॅंक खात्यात पहिल्या टप्प्यातील रकमा टाकण्यात आल्या. मात्र परिसरातील ७५ टक्के अजूनही पीकविम्याच्या रकमेपासून वंचित राहिले आहेत. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रकमा टाकण्यात येतील असे सांगण्यात येते. मात्र आता रब्बी हंगामाच्या तयारीला शेतकरी लागले आहेत. पेरणी, बियाणे, खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैशाची आवश्‍यकता आहे. त्यामुळे पीकविम्याचे लवकर वाटप करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. संबंधित हेल्पलाईनवरही तक्रारींची दखल घेतली जात नसल्याचे आकोली येथील शेतकरी दामोदर सोळंके यांनी सांगितले.

रब्बी हंगामासाठी पैशाची तजवीज म्हणून शेतकऱ्यांना पीकविमा मिळणे गरजेचे आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन शेतकऱ्यांनी पीकविमा मिळवून द्यावा.

- कोंडीबा बरसाले शेतकरी, आसनगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT