jafarabad 
मराठवाडा

कृषि कायद्यांविरोधात जाफराबाद येथे चक्का जाम आंदोलन

गजानन उदावंत

जाफराबाद (जालना): मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारने संसदेत पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात देशभर संतोष व्यक्त केला जात आहे. पंजाबचे शेतकरी दिल्लीच्या वेशीवर मागील अडीच महिन्यांपासून तळ ठोकून आहेत. दिवसेंदिवस दिल्लीकडे येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कृषी कायद्याच्या मुद्द्यावरुन घेरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

इकडे महाराष्ट्रातही ठिकठिकाणी कृषी कायद्यांविरोधात आंदोलने होत आहेत. कृषी कायदे रद्द करण्यासाठी देशातील शेतकरी संघटनांनी 6 तारखेला देशव्यापी चक्का जाम आंदोलनाची हाक दिली आहे. याला पाठिंबा देण्यासाठी जाफराबाद येथे शिवाजी चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत कृषि कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी जि. प. अध्यक्ष ऊत्तमराव वानखेडे, कांग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश गवळी, नगरसेवक बाळकृष्ण हिवाळे, उपनगराध्यक्ष शेख मुजीब, दिपक बोराडे, कुंडलिक मुठठे, साबेद चाऊस, ॲड. विनोद डिगे उपस्थित होते.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT