jalna news  sakal
मराठवाडा

Jalna News : संसार मोडला अर्ध्यावर, विजेच्या खांबात उतरलेल्या विज प्रवाहाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

दूध घेऊन तो सहा वाजेदरम्यान घरी परतला. यादरम्यान घराजवळील एका विजेच्या खांबात रिमझिम पावसामुळे विज प्रवाह उतरला

दीपक सोळंके

भोकरदन - घराजवळील विजेच्या खांबाला अचानक स्पर्श होवून जोरदार विजेचा शॉक लागल्याने तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना (ता.सात) गुरुवारी सकाळी सहा वाजेदरम्यान भोकरदन तालुक्यातील बोरगाव जहांगीर गावात घडली. ईश्वर पुंजाराम दळवी (वय 27) असे या घटनेत मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील बोरगाव जहांगीर येथील शेतकरी ईश्वर पुंजाराम दळवी याची गावलगत शेतजमीन आहे. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते दूध आणण्यासाठी शेतात गेला होता. दूध घेऊन तो सहा वाजेदरम्यान घरी परतला.

यादरम्यान घराजवळील एका विजेच्या खांबात रिमझिम पावसामुळे विज प्रवाह उतरला. शेतकरी ईश्वरला याची कल्पना नव्हती. तो या खांबा जवळून जात असतांना अचानक त्याचा खांबाला स्पर्श झाला व त्याला विजेचा जोरदार शॉक लागला.

काहीवेळाने ही घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. गावकऱ्यांनी तत्काळ त्याला भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, येथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. ईश्वर याचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. सुखी संसाराचे स्वप्न रंगवत असतांना अचानक काळाने त्याच्यावर घाला घातला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT