Vidarbha Sakal
मराठवाडा

Jalna News : गर्भलिंग निदान केंद्राची माहिती देणाऱ्यास बक्षीस

जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दालनात पीसीपीएनडीटी ॲक्ट-१९९४ अंतर्गत जिल्हा सल्लागार समितीची बैठक झाली.

सकाळ वृत्तसेवा

जालना - जिल्ह्यात बेकायदेशीरपणे गर्भलिंगनिदान व गर्भपात होत असल्याची माहिती नागरिकांनी दिल्यास त्यांना एक लाख रुपयांपर्यंत बक्षीस देण्यात येईल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रताप घोडके यांनी दिली. शिवाय माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे.

जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दालनात पीसीपीएनडीटी ॲक्ट-१९९४ अंतर्गत जिल्हा सल्लागार समितीची बैठक झाली.

तेव्हा ते बोलत होते. यावेळी समितीच्या अध्यक्षा डॉ.सरोज घोलप व सदस्य डॉ.स्मिता गावडे, डॉ.सुरजित अंभोरे, ॲड. इंगळे, संगीता गायके, मंजूषा काकडे, प्रतिभा मसावले, डॉ.व्ही.डी.वाकोडे, विधी सल्लागार ॲड. सोनाली कांबळे यांची उपस्थिती होती.

जिल्ह्यात अवैध गर्भपात थांबविण्यासाठी नागरिकांनी गर्भलिंग निदान केंद्राची माहिती १८००२३३४४७५ या हेल्पलाईन क्रमांकावर द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. घोडके यांनी केले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. घोडके यांची माहितीma

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT