jalna  sakal
मराठवाडा

Jalna News : मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या, ओबीसी जनजागृती साठी भेटी देणार - छगन भुजबळ

ओबीसी मध्ये मागासप्रर्वग मधील लोक आहेत.आपलं दुख असेल तर आपण बोलले पाहिजे,

सकाळ वृत्तसेवा

दिलीप दखने

वडीगोद्री - मराठा समाजाला आरक्षण द्या आमचा विरोध नाही मात्र ओबीसी आरक्षणा धक्का लावु नका वेळ पडल्यास सरकारला भांडु असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवार (ता.6 ) रोजी दोदडगाव, वडीगोद्री ता.अंबड येथे बोलतांना सांगितले.

भुजबळ हे संभाजीनगर येथुन बीड कडे जात असतांना दोदडगाव( ता.अंबड ) येथील मंडळ स्तंभावर अभिवादन करण्यासाठी व अंतरवाली सराटी रोड, वडीगोद्री येथे कार्यकर्ते यांना भेटण्यासाठी थांबले होते. या वेळी भुजबळ यांच्या सोबत माजी आ.नारायण मुंढे ,सत्संग मुंढे ,बळीराम खटके आदी उपस्थित होते.या वेळी भुजबळ यांनी सांगितले कि.

ओबीसी मध्ये मागासप्रर्वग मधील लोक आहेत.आपलं दुख असेल तर आपण बोलले पाहिजे, आपल्यावर अन्याय होत असेल, आपल्याला दुख होत असेल त्याला कोणी डाँक्टर भेटणार नाही ,औषध देणार नाही, त्यामुळे आपले हक्काचे ओबीसी आरक्षण अबाधित राहण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्यासाठी प्रयत्न करावे.मराठवाडा व राज्यात खरोखर निजामकाळीन कुणबी प्रमाणपत्र मिळाले असतील यांना विरोध नाही ,आरक्षण द्या म्हणालो,

परंतु अगोदर मराठा समाजाला 5 हजार कुणबीचे प्रमाणपत्र सापडले, नंतर 10 हजार, नंतर 15 हजार, मग अख्खा महाराष्ट्रात, म्हणजे समोरच्या दरवाजातून प्रवेश मिळत नाही तर, मागच्या दारातून येण्याचा हा कार्यक्रम आहे,,मराठा समाजाला आरक्षणास देण्यात विरोध नाही ,परंतु मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या , आमच्या आरक्षणात तुम्ही येवू नका,

ओबीसी मध्ये जवळपास 354जाती असुन 54 टक्के पेक्षा जास्त लोक आहेत यांच्या आरक्षणावर गदा येईल,आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. समानता निर्माण करण्यासाठी आहे. 70 वर्षाच्या लढ्यानंतर आम्हाला आरक्षण मिळाले असून अजूनही समाज मागासच आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, पण सरसकट ओबीसीतून नको, तर स्वतंत्र आरक्षण द्या, सत्ताधारी, विरोधक सदस्य प्रश्न मांडणार नाही, तुम्ही तुमच्या पध्दतीने एक होऊन यासाठी माळी,कोळी, धनगर,वंजारी, तेली, तांबोळी साळी, यांनी वेगळवेगळा आवाज उठवू , सर्वांनी एकत्र आवाज उठवावा,

तुम्ही तयार असतील तर मी पण तयार आहे, तुम्ही जिथे जातान मी तिथे तिथे यायला तयार आहे सरकारच्या विरोधात सुध्दा तयार असल्याचे छगन भुजबळ यावेळी म्हणाले.

ओबीसी आरक्षण अबाधित राहावे ,मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात येऊ नये या करीता शुक्रवार ता.17 रोजी महा ऐल्गार सभेचे अंबड येथे आयोजन करण्यात आले असुन या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ हे मार्गदर्शन करणार आहे.

सत्संग मुंढे,

समन्वयक महा एल्गार मेळावा,दोदडगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT