protest  sakal
मराठवाडा

Jalna News : बदनापूरला राजकीय पुढाऱ्यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेला जोडे मारले, प्रतिमांचे केले दहन

यावेळी आंदोलकांनी जालना - छत्रपती संभाजीनगर महामार्ग काहीकाळ रोखून धरला होता.

आनंद इंदानी

बदनापूर - बदनापूर येथे जालना - छत्रपती संभाजीनगर महामार्गावर बदनापूर शहरासह तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी एकत्र येत सर्वच राजकीय पुढाऱ्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमांना जोडे मारत त्यांच्या नावाने बोंबाबोंब केली. शिवाय प्रतिमांची आगीत होळी केली.

यावेळी आंदोलकांनी जालना - छत्रपती संभाजीनगर महामार्ग काहीकाळ रोखून धरला होता. यावेळी आंदोलकांनी मराठा आरक्षण मंजूर करण्यात उदासीनता दाखविणाऱ्या पुढाऱ्यांच्या प्रतीकात्मक प्रतिमांना जोडे मारत त्यांच्या नावाने शिव्या - शापांची लाखोळी वाहिली. यावेळी त्यांच्या नावाने बोंबाबोंब देखील ठोकून अनोखे प्रतीकात्मक आंदोलन केले. बदनापूर शहर व तालुक्यातील उपस्थित सकल मराठा समाज बांधवांनी "एक मराठा - लाख मराठा", "आरक्षण आमच्या हक्काचे" अशा घोषणा देत अवघा परिसर दणाणून सोडला.

दावलवाडी पाटी आणि सेलगावात रास्ता - रोको

बदनापूर तालुक्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. आरक्षणाच्या बाबतीत सरकार केवळ आश्वासन देत असल्याने संतप्त मराठा बांधव आता रस्त्यावर उतरले आहेत. जालना - छत्रपती संभाजीनगर महामार्गावर दावलवाडी पाटी येथे दावलवाडी आणि खादगाव येथील मराठा तरुणांनी टायर पेटवत रास्ता - रोको आंदोलन केले. तर सेलगाव येथे देखील आंदोलकांनी रास्ता - रोको करीत दोन्ही बाजूची वाहतूक अडवून ठेवली. या आंदोलनामुळे दोन्ही बाजूची वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती.

यावेळी आंदोलकांनी "एक मराठा - लाख मराठा" अशा घोषणा देत अवघा आसमंत दणाणून सोडला. यावेळी बदनापूर पोलिसांना आंदोलकांची समजूत घालून त्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. दरम्यान, सेलगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेत कँडल मार्च काढण्यात आला. यात मराठा बांधवांसह भगिनी आणि लहान मुले देखील हजारोंच्या संख्येने सहभागी झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : निजामाचं गॅझेट स्वीकारलं म्हणता मग तुम्ही इंग्रजांच्या परिवारातले आहात का ? मनोज जरांगेंना राग अनावर, जीभ घसरली?

Dussehra 2025: चक्क...या गावात होते रावणाची पूजा? काय आहे नेमकी परंपरा जाणून घेऊयात

Dussehra Melava 2025 Live Update: वणी येथे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे संचलन व शस्त्रपूजन उत्साहात

Mangalwedha Farmers : स्वतःचे नुकसान बाजूला ठेवत सरकारलाच 15 रुपये मदतनिधी पाठवला

Latest Marathi News Live Update : शतंचडी यागास पुर्णाहूती व महाआरतीने वणी गडावर नवरात्रोत्सवाची सांगता...

SCROLL FOR NEXT