Jalna Police seized Large stock of weapons accused arrested
Jalna Police seized Large stock of weapons accused arrested sakal
मराठवाडा

जालना : तलवारींच्या शोधासाठी पोलिसांचे छापासत्र

सकाळ वृत्तसेवा

जालना : धुळे येथे काही दिवसांपूर्वी तलवारीचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. या तलवारीच्या साठ्याचे जालन्याशी कनेक्शन होते, त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी स्थानिक गुन्हे शाखा व चंदनझिरा पोलिसांनी तब्बल आठ ठिकाणी छापे टाकले. यात दोन तलवारी आढळल्या. दरम्यान, दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जालना येथे येणाऱ्या तलवारीचा मोठा साठा धुळे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी जप्त केला होता. शिवाय या तलवार साठ्यासह जालन्यातील काही संशयितांनाही पकडले होते. या प्रकरणी चौकशीत संशयितांनी यापूर्वीही जालना येथे काही तलवारी विक्री केल्याची माहिती धुळे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार धुळे पोलिसांनी जालना स्थानिक गुन्हे शाखेला या संदर्भात माहिती दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि चंदनझिरा पोलिसांनी सोमवारी आठ ठिकाणी छापे टाकले.

यात चंदनझिरा भागातील सुंदरनगर येथील संशयित अंकुश नारायण मेरकुटे व शेख मुजीब शेख सिकंदर या दोघांच्या घरातून प्रत्येकी एक अशा दोन तलवारी पोलिसांनी जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी या दोन ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रघुनाथ नाचण, सहायक पोलिस निरीक्षक संदीप सावळे, कर्मचारी संजय मगरे, रूस्तूम जैवाळ, रंजीत वैराळ, देविदास भोजने, भागवत खरात, संजय गवई, रवी देशमुख, नंदलाल ठाकूर, विजय साळवे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Heat Wave : विदर्भात आजपासून उष्णतेची लाट, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

SCROLL FOR NEXT