police sakal
मराठवाडा

Jalna : झोपेत शेकोटीत पडून होरपळला? सुरक्षारक्षकाचा संशयास्पद मृत्यू

सुरक्षारक्षकाचा मृतदेह शेकोटीत संशयास्पदरित्या

सकाळ वृत्तसेवा

बदनापूर : बदनापूर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या नवदुर्गा राजस्थान ढाब्यावर काम करणाऱ्या सुरक्षारक्षकाचा मृतदेह शेकोटीत पालथे पडलेल्या व अर्धवट जळालेल्या अवस्थेत मंगळवारी पहाटेच्या सुमारास आढळला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक शिवाजीराव बंटेवाड यांच्यासह बदनापूर पोलिसांनी घटनस्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.

दरम्यान, या घटनेबाबत ढाब्याच्या मालकाने दिलेल्या माहितीवरून बदनापूर पोलिस ठाण्यात मंगळवारी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, सुरक्षारक्षकाचा मृतदेह शेकोटीत संशयास्पदरित्या सापडल्याने हा प्रकार अपघात की घातपात? या विषयी चर्चा होत आहे.

जालना - औरंगाबाद महामार्गावर बदनापूर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर नवदुर्गा राजस्थान ढाबा आहे. या ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून मृत तुकाराम सखाराम शिंदे (वय 62 रा. कैलासनगर, बदनापूर) हे काम करीत होते. सध्या थंडीचे दिवस असल्याने ते ढाबा बंद झाल्यावर सोमवारी (ता. 12) रात्री उशिरा एका खुर्चीवर बसून समोर शेकोटी पटवून शेकत बसले होते. मात्र मंगळवारी (ता. 13) पहाटेच्या सुमारास त्यांचा मृतदेह पालथ्या व अर्धवट जळालेल्या अवस्थेत शेकोटीवर सापडला.

ही माहिती मिळताच घटनस्थळावर बघ्यांची गर्दी झाली. त्यांनी तात्काळ बदनापूर पोलिसांना माहिती दिली असता पोलिस निरीक्षक शिवाजीराव बंटेवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बदनापूर रुग्णालयात पाठवला. दरम्यान, या संदर्भात पोलिस निरीक्षक बंटेवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, सुरक्षारक्षक शिंदे हे शाल अंगावर घेऊन खुर्चीवर बसून शेकोटी करीत होते. त्याच अवस्थेत ते पालथे शेकोटीत पडले असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे.

त्यानुसार तूर्त राजस्थान ढाब्याचे मालक सुखदेव मोतीराम चौधरी यांच्या माहितीवरून पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अर्थात शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल. मृत तुकाराम शिंदे यांच्या पश्चात पत्नी आणि तीन विवाहित मुली आहेत, अशी माहिती नगरसेवक बाबासाहेब कऱ्हाळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG supply India news : आनंदाची बातमी! गॅस टंचाई दूर होणार, स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून २० हजार ४०० मेट्रिक टनाचे एलपीजी मुंबईकडे रवाना

Mumbai News: यूपी-बिहार आणि अन्य शहरातून येणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबईत परवडणारी घरे मिळणार; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Viral Video : विराट कोहलीची 'कॉपी' करायला गेला, बाबर आझम स्वतःच्याच जीवाशी खेळला... थोडक्यात वाचला, सर्व खेळाडू पळत आले...

Chhagan Bhujbal helicopter landing : हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये का उतरावं लागलं छगन भुजबळांनी सविस्तर सांगितलं

Monali Jadhav : जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर मोनालीने पुणे शहर पोलीस दलात कॉन्स्टेबल पद मिळवत कुटुंबाचे स्वप्न केले साकार

SCROLL FOR NEXT