Mantha police station meeting 
मराठवाडा

जालना : सोशल मीडियाच्या पोस्टबाबत सजगता आवश्‍यक

अक्षय शिंदे : मंठा पोलिस ठाण्यात शांतता समिती बैठक

सकाळ वृत्तसेवा

मंठा : सोशल मीडियाचा वापर जसा चांगला तसा तो घातकही आहे. त्यामुळे आलेली प्रत्येक पोस्ट वाचल्याशिवाय फॉरवर्ड करू नका, पोस्टचे समाजात काय परिणाम होतील याचा विचार करा. सोशल मीडियाच्या पोस्टबाबत सजगता आवश्‍यक आहे, असे पोलिस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे यांनी नमूद केले.

मंठा पोलिस ठाण्यात श्री.शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवारी आगामी सण-उत्सव याबाबत शांतता समितीची बैठक झाली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी राजू मोरे, पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांची उपस्थिती होती. पोलिस अधीक्षक शिंदे म्हणाले, की चुकीच्या किंवा जातीय ते निर्माण करणाऱ्या पोस्टचे काय परिणाम होतील याबाबत मोबाईल वापरणाऱ्या मुलांना समजत नाही.

चुकीच्या किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टकडे पालकांनी देखील लक्ष देणे गरजेचे आहे. आतापर्यंत शहरासह तालुक्यात शांतता तसेच सामाजिक एकोपा आहे. तरी देखील प्रत्येक नागरिकांनी जागरूक राहावे. काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असेल तर पोलिस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.

या बैठकीस माजी उपनगराध्यक्ष सिराजखान पठाण, नगरसेवक बाज पठाण, मुसा कुरेशी, कय्यूम कुरेशी, मुस्तफा पठाण, अरुण वाघमारे, अन्साबाई राठोड, जयश्री पवार, कासाबाई शिरगुळे तसेच फौजदार आसमान शिंदे, फौजदार बलभीम राऊत व तालुक्यातील पोलिस पाटील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT