jalna sakal
मराठवाडा

Jalna : तीन दशकांपासून समाजसेवेचा अविरत वसा

जालन्याच्या रसना देहेडकर यांची प्रेरणादायी वाटचाल

सुहास सदाव्रते

जालना : गरजू श्रमिक कष्टकरी महिलांना त्यांचे हक्क मिळावेत यासह मानवाधिकार आणि ‘विशाखा’ समिती माध्यमातून तीन दशकांपासून रसना रमेश देहेडकर यांचे कार्य अविरत सुरु आहे,हे विशेष...शहरात नवचैतन्य महिला मंडळाच्या माध्यमातून नव्वदच्या दशकात रसना देहेडकर यांनी सामाजिक कार्याचा वसा हाती घेतला.तीन दशकापेक्षा अधिक काळापासून महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतात.सुरुवातीला नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून सामाजिक कार्यात व्यस्त राहत असत. नंतरच्या काळात जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे.

नोकरदार महिलांच्या समस्या आणि प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी असलेल्या विशाखा समिती सदस्या म्हणून रसना काम पाहतात. शहरातील विक्रीकर कार्यालयात असलेल्या महिलांच्या समस्या निवारण समितीचे काम रसना देहेडकर पाहतात.जिल्हा शांतता समिती, स्त्री आधार केंद्र, साक्षरता अभियान असो,की इतर सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार असतो.

महाराष्ट्र राज्य अंधत्व निवारण समितीच्या जिल्हा समितीवर रसना या आजीव सदस्य म्हणून काम पाहत आहेत. सामाजिक कार्यासाठीचा महाराष्ट्र शासनाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्काराने रसना यांना गौरविण्यात आले आहे. पुणे येथील साहित्य कलायात्री संस्था, जालन्यातील भाईश्री फाउंडेशन यासह एकता गौरव पुरस्कार रसना यांना सामाजिक कार्यासाठी प्रदान करण्यात आले आहे. सध्या महिला तक्रार निवारण समिती, मानवाधिकार संघटनच्या कार्यात रसना व्यस्त राहतात. स्त्री आधार केंद्र असो,की रेड स्वस्तिक सोसायटी अशा संस्थांच्या माध्यमातून रसना या महिलांच्या आरोग्य, शिक्षण कार्यासाठी प्रयत्न करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT