JCB
JCB esakal
मराठवाडा

Jalna : टेंभुर्णी येथील घरांवर फिरविला JCB

सकाळ वृत्तसेवा

टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे गायरान जमिनीवर अतिक्रमण करून राहत असलेल्या १६ निवासी घरांवर शनिवारी(ता.४) कार्यवाही करण्यात आली. जेसीबीच्या साह्याने सदर अतिक्रमणे निष्काशित करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, टेंभुर्णी येथील गायरान व गावठाण मध्ये ८३० ग्रामस्थांनी अतिक्रमण केल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या अनुषंगाने शनिवारी महसूल विभागाने कार्यवाही केली. दरम्यान निवासी घरे नियमाकुल करण्यासाठी ८३० पैकी ७४६ ग्रामस्थांनी न्यायालयात धाव घेतल्याने सदर घरांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. मात्र, ज्या ग्रामस्थांनी न्यायालयात दाद मागितली नव्हती. त्या १६ जणांची घरे पाडण्यात आली.

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी अतुल सोरमारे, तहसीलदार स्वरूप कंकाल, पोलिस उपविभागीय अधिकारी इंदल सिंग बहुरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे, ग्रामविकास अधिकारी जगदीश आढाव, तलाठी राम धनेश यांच्यासह प्रशासनाचा मोठा ताफा कारवाईसाठी सकाळीच दाखल झाला होता.

दरम्यान गट क्रमांक २७९ व ८०६ मधील सोळा अतिक्रमणे निष्कासित करून त्या ठिकाणी शासकीय जागा म्हणून फलक लावण्यात आले. महसुलांतर्गत येणाऱ्या ८४ निवासी घरांपैकी ६८ ग्रामस्थांनी स्टे मिळाला असल्याने त्यावर शनिवारी कार्यवाही करण्यात आली नाही. टेंभुर्णी येथील गट क्रमांक एकसह विविध भागांमध्ये वाढीव गावठाण अंतर्गत ५१७ ग्रामस्थ मागील ५० ते ६० वर्षापासून निवासी घरे बांधून राहत आहेत.

परंतु त्यांना अतिक्रमणधारक म्हणून नोटीस आल्यापासून अनेकांची धाकधूक वाढली होती. दरम्यान शासकीय नियमानुसार घरे नियमाकुल करण्यासाठी अनेकांनी न्यायालयात दाद मागितली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Pune Visit : सुरेश कलमाडींनी पुण्यात पंतप्रधानांना चप्पल फेकून मारली अन्...

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

SCROLL FOR NEXT