संग्रहित छायाचित्र. 
मराठवाडा

जालना झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची जानेवारीत निवड  

सकाळ वृत्तसेवा

जालना -  जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी ता.सहा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात निवडणूक घेण्यात येणार आहे. अध्यक्षपद मिळविण्यासाठी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीच्या वतीने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. 

केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकतीच भोकरदनला बैठक घेऊन कार्यकर्त्यांची मने जाणून घेतली. त्यामुळे येत्या सहा जानेवारीला भारतीय जनता पक्ष काही चमत्कार करणार काय, याबाबत वेगवेगळी चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांना एकशे वीस दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. ता.20 डिसेंबर रोजी ही मुदतवाढ समाप्त झाली आहे. जालना झेडपीचे अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे.

त्यामुळे शासनाने आरक्षित केलेल्या संवर्गानुसार अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडीसाठी जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली ता.सहा जानेवारी रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर लगेचच भारतीय जनता पक्ष, शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीच्या नेत्यांनी बैठका घेऊन बहुमताची चाचपणी केली. शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे बहुमत असल्यामुळे अध्यक्षपद सहज मिळेल अशी अपेक्षा महाआघाडीच्या वतीने व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे भाजपच्या वतीनेही जोरदार हालचाली सुरू असून, केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी भोकरदन येथे प्रमुख कार्यकर्त्यांची नुकतीच बैठक घेऊन रणनीती ठरविल्याची चर्चा यानिमित्ताने होत आहे. असे असले तरीही प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी काय चमत्कार होतो याकडे लोकांचे लक्ष आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'बुमराह जर UAE विरुद्ध खेळला, तर आंदोलन करेल', माजी भारतीय क्रिकेटपटूने कंल जाहीर

Yermala Crime : सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर चालत्या ट्रकची ताडपत्री फाडून, लुटणाऱ्या सहा चोरट्याना अटक

Latest Marathi News Updates Live: बीडमध्ये हुंडाबळी प्रकरणात तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल

Explained: भारतातील महिलांसाठी हृदय निरोगी राखण्याचा मार्ग – अँजाइनाबाबत सर्व महत्त्वाची माहिती

Cotton Import : कापूस आयात धोरण: जळगावच्या शेतकऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT