परभणी कोवीड सेंटर, जांब
परभणी कोवीड सेंटर, जांब 
मराठवाडा

लसीकरणासाठी परभणीतील जांब आरोग्य केंद्र ठरतेय आदर्श

बाबा कासार

जांब (ता. जि. परभणी) ः कोरोना विषाणु प्रतिबंधक लसीकरणाने आता ग्रामीण भागात जोर पकडला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेने केले नियोजन हेच आहे. जांब (ता. परभणी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुनियोजनामुळे लसीकरणासोबत आरोग्य केंद्रातील नित्याच्या तपासण्या व इतर कामे व्यवस्थीत सुरु आहेत.

परभणी जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात झाली आहे. शनिवारी (ता. १९) पासून ३० वर्षावरील नागरीकांचे लसीकरण सुरु झाले आहे. जांब (ता. परभणी) प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत ३० गावे व आठ उपकेंद्र येतात. या उपकेंद्रातही दिवस ठरवून लसीकरण केले जात आहे. आठवड्यातून एक दिवस एका उपकेंद्रावर लसीकरण केले जात आहे. त्याच बरोबर गावातही जावून लसीकरणाचे काम करण्यात या प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी, कर्मचारी पुढे आहेत. केवळ लसीकरणच नव्हे तर लसीकरणाबाबत ग्रामस्थामध्ये जनजागृतीचे काम ही केले जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या मनातील संभ्रम दुर होण्यास मदत होत असून लोकांनी लसीकरणास प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा - नांदेडात 700 वृक्षांची घनवन पद्धतीने लागवड; 400 वृक्षांना ट्री गार्ड

लसीकरणासोबतच इतर कामे सुरु

केवळ लसीकरण करुन दिवस पार पाडायचा असे न करता गावातील इतर छोट्या मोठ्या आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांवर देखील उपचार करण्याचे काम या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून नित्यपणे केले जात आहेत. त्यामुळे लसीकरणाच्या कामाचा इतर कामावर कसलाही परिणाम दिसून आला नाही.

जांब प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत येणाऱ्या गावांमध्ये आम्ही वारंवार भेटी देत आहोत. जिल्हाप्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन व आरोग्य विभागाने घालून दिलेल्या नियमांचे पूर्णपणे पालन करण्याचा प्रयत्न करतो.

- डॉ. सय्यद जुनेद अहमद, वैद्यकीय अधिकारी, जांब

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; सूत्रांची माहिती

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT