गोकर्णा सचिन राठोड
गोकर्णा सचिन राठोड  sakal
मराठवाडा

जिंतूर : चालकाच्या पत्नीने सैनिक होण्याचे स्वप्न केले पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

जिंतूर : जिद्द, कठोर परिश्रम आणि सासरकडील मंडळीच्या पाठबळावर बिकट परिस्थितीतही एका चालकाच्या पत्नीने देशसेवेसाठी सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण केले. ही प्रेरणादायी यशोगाथा आहे, जिंतूर तालुक्यातील साईनगर तांड्यातील एका २३ वर्षीय मातेची. गोकर्णा सचिन राठोड असे तिचे नाव आहे. सैन्यदलात भरती होणारी जिंतूर तालुक्यातील बंजारा समाजाची ती पहिलीच महिला असल्याचे बोलले जात आहे.

देशसेवेसाठी भारताच्या सीआरपीएफ दलात निवड झाल्यावर अकरा महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण करून चार दिवसांपूर्वी गोकर्णाचे आपल्या गावी साईनगर तांड्यावर आगमन झाले. यावेळी तांडावासीयांसह नातेवाइकांनी फटाक्यांची आतषबाजी करत वाजतगाजत मोठ्या जल्लोषात तिचे स्वागत करून मिरवणूक काढली. यावेळी सर्वांच्याच डोळ्यात आनंदाश्रू वहात होते. २०१६ मध्ये गोकर्णाचे साईनगर तांडा येथील सचिन प्रकाश राठोड यांच्याशी विवाह झाला. घरी चार एकर शेती असून, सासू- सासरे शेती करतात. कुटुंब मोठे असल्याने घरची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे पती खासगी वाहनावर चालक म्हणून नोकरी करतात. सासरी आलेल्या गोकर्णाने देखील शेतकाम केले. परंतु, देशासाठी काहीतरी वेगळे करून दाखवण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नसल्याने तीने सासरच्या मंडळींकडे पुढील शिक्षणाची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार त्यांनी उच्च माध्यमिक शिक्षणासाठी गोकर्णाला बाहेरगावी पाठवले.

तिनेही त्यांचा विश्वास सार्थ ठरवत बारावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. मनात देशसेवा करण्याची जिद्द असल्याने शेतात काम करत पुढील अभ्यास सुरूच ठेवला. विशेष म्हणजे गोकर्णा- सचिन या दांपत्याला चार वर्षांची मुलगी आहे.

५ जून २०२२ पर्यंत सैनिकी प्रशिक्षण पूर्ण करून गोकर्णा घरी आली. घरी येताना तिने सासऱ्यांना सॅल्यूट केला, आपल्या डोक्यावरील टोपी काढून सासऱ्याच्या डोक्यावर ठेवली. हा क्षण खूपच भावुक असल्याने उपस्थित नातेवाईक व गावकरी यांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू आले. यावेळी गोकर्णा यांच्या स्वागतासाठी गोर सेनेचे अध्यक्ष तथा उपसरपंच विजय आढे, प्रकाश राठोड, अमोल जाधव, हरिदास राठोड, विनोद राठोड, विकास राठोड, कोंडिराम जाधव, बबन चव्हाण, राजू राठोड, गणेश चव्हाण, सचिन राठोड, अविनाश आढे, पंढरीनाथ जाधव, भालचंद्र राठोड आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT