file photo
file photo 
मराठवाडा

जिंतूर : एसडीएमने केली कोवीड सेंटरची तपासणी; बाधितांशी साधला संवाद

राजाभाऊ नगरकर

जिंतूर ( जिल्हा परभणी ) : उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी गुरुवारी (ता. आठ) शहरातील अल्पसंख्याक मुलींच्या वसतीगृहातील कोवीड- १९ सेंटरला अचानक भेट दिली. यावेळी श्री पारधी यांनी कोरोना बाधितांना दिल्या जाणाऱ्या आवश्यक सोयीसुविधांची माहिती घेत रुग्णांशी थेट संवाद साधून सोयीसुविधाबाबत आढावा घेतला. 

शहरासह तालुक्यात मागील कांही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने भविष्यात कोरोना सेंटरमध्ये रुग्णांची वाढ झाल्यास अडचण निर्माण होऊ नये तसेच सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांना आरोग्य विभाग व महसूल विभागाच्यावतीने योग्य त्या सुविधा पुरवल्या जात आहेत किंवा नाही याची पाहणी केली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुका टास्क फोर्स कोव्हीड -19 प्रतिबंधात्मक उपायोजना याविषयी आरोग्य विभाग, नगरपरिषद प्रशासन, पोलिस प्रशासन, शिक्षण विभाग यांची संयुक्तिक बैठक घेऊन कोरोना संदर्भातील मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. यावेळी तहसीलदार सखाराम मांडवगडे, उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रविकिरण चांडगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. दुर्गादास कान्हडकर, उपशिक्षणाधिकारी श्री. लोखंडे, मंडळ अधिकारी प्रशांत राखे, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कोरोना बधितांना सर्वोत्तम सुविधा देऊ 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुसंख्य नागरिकांच्या मनात कोव्हीड सेंटर आणि आजाराविषयी भीती आहे. नागरिकांच्या मनातील कोरोना संदर्भातील भीती नाहीशी करण्यासाठी जनजागृतीची गती वाढविण्यात आली आहे. शिवाय कोव्हीड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना असुविधेचा सामना करावा लागू नये यासाठी रुग्णांना सर्वोत्तम सुविधा पुरविण्याकरिता प्रयत्न सुरु असल्याचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी सांगितले. 

लसीकरणाची गती वाढविण्यासाठी विविध उपक्रम 

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरणाचे प्रमाण वाढणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी महसूल विभागाने पुढाकार घेतला असून शहर व ग्रामीण भागात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याकरिता शहर तसेच ग्रामीण भागात वॉर्ड समित्यांची स्थापना करुन लसीकरणाची गती वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी दिली.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Labour Day : 1 मे ला कामगार दिवस का म्हटले जाते? काय आहे यामागचा इतिहास? वाचा सविस्तर

रोहित शर्मा-विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-२० ला ठोकणार रामराम, 2024 चे वर्ल्डकप शेवटचे- रिपोर्ट

शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी! पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी ऑगस्टपर्यंत मुदत; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सवलत, पण शेतकऱ्यांची संमती पुनर्गठन आवश्यक

Maharashtra Day 2024: महाराष्ट्र दिनानिमित्त द्या खास अंदाजात मराठमोळ्या शुभेच्छा

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT