poisoned by eating bhagar sakal
मराठवाडा

Jintur News : एकादशीच्या दिवशी भगर खाल्ल्याने सात जणांना विषबाधा

एकादशीच्या दिवशी उपवास असल्यामुळे फराळाला भगर खाल्ल्याने सात जणांना विषबाधा झाल्याची घटना जिंतूर शहरात व तालुक्यातील ब्राम्हणगाव, बोरगळवाडी येथे घडली.

सकाळ वृत्तसेवा

जिंतूर - एकादशीच्या दिवशी उपवास असल्यामुळे फराळाला भगर खाल्ल्याने सात जणांना विषबाधा झाल्याची घटना जिंतूर शहरात व तालुक्यातील ब्राम्हणगाव, बोरगळवाडी येथे घडली. मागील महिन्यात देखील तालुक्यात भगर खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना होती.

गुरुवारी (ता. ७) विजया भागवत एकादशी होती. यादिवशी उपवास असल्यामुळे रात्री तालुक्यातील ब्राम्हणगाव, बोरगळवाडी व जिंतूर येथील काही जणांनी भगर खाल्ली. यामुळे अनेकांना मळमळ, चक्कर, उलटी होणे व पोटात दुखणे सुरु झाले. त्यामुळे शुक्रवारी सकाळी त्यांना नातेवाईकांनी जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सर्व रुग्णांवर ग्रामीण रुग्णालय उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

विषबाधा झालेल्यामध्ये अशोक कचरू माघाडे (वय-५० वर्षे), लता अशोक माघाडे (वय-४८ वर्षे, रा. ब्राम्हणगाव), भगवान सोपान पजई (वय-३४ वर्ष, रा. जिंतूर), सोनाजी किसन दुभळकर (वय-४० वर्षे), अंजना सोनाजी दुभळकर (वय३५ वर्षे), संगीता अशोक दुभळकर (वय-३० वर्षे, तिघेही रा. बोरगळवाडी) आणि लक्ष्मीबाई तुळशीराम मोरे (वय-५९ वर्षे, रा. चिंचोली दराडे) यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : सहकार क्षेत्राला शैक्षणिक बळ देणारा ऐतिहासिक टप्पा : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT