jintur water crisis yeldari dam water storage 29 percent available Sakal
मराठवाडा

Jintur News : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची छाया गडद; येलदरी धरणात २९ टक्के जलसाठा

करपरा प्रकल्पात शून्य टक्के; २३ पैकी २२ लघु प्रकल्प कोरडेठाक

सकाळ वृत्तसेवा

जिंतूर : तालुक्यातील येलदरी धरणात फक्त २९.२८ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून करपरा प्रकल्पात शून्य टक्के टक्क्यात आले आहे. तर २३ लघु सिंचन प्रकल्पांपैकी भिलज तलवात २५ टक्के पाणीसाठा उप असून २२ लघु प्रकल्प कोरडेठाक पडले.शिवाय जमिनीतील पाणीपातळीही खोल गेली असल्याने भूप्रष्ठावरील बहुतांश जलस्त्रोत आटले आहेत त्यामुळे तालुक्यात दिवसेंदिवस जलसंकटाची छाया गडद होत आहे.

गतवर्षी २०२३ च्या पावसाळ्यात तालुक्यात सरासरीपेक्षा ३५ टक्के पर्जन्यमान कमी झाले. यावर्षी फेब्रुवारीपासून उन तापू लागले असून महिन्यापासून सातत्याने उन्हाची तीव्रता वाढत असल्याने होत असलेल्या बाष्पीभवनामुळे भूपृष्ठावरील पाणीसाठे केंव्हाच आपले,

विहिरी, हातपंपांचे पाणी खोल खोल गेले,परिणामी ग्रामीण भागात अनेक गावे, वाड्या वस्त्या, तांडे येथे पाणीटंचाईची समस्या लवकरच निर्माण झाली. टंचाई निवारणासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. पण त्या अपुऱ्या पडत असल्याने दिवसेंदिवस ग्रामीण भागातील पाणीटंचाईचे पडसाद होत आहेत.

जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील धरण मोठे आहे. पूर्णा नदीच्या पात्रात कार्यान्वित या धरणावर जलविद्युत निर्मितीसह लाभक्षेत्रातील हजारो हेक्टर क्षेत्राची सिंचन व्यवस्था अवलंबून आहे तसेच जिंतूर तालुक्यासह परभणी हिंगोली,

नांदेड जिल्ह्यातील शेकडो गावांची तहान धरणाच्या पाण्यावर भागवली जाते. बुधवारी (१५ मे) धरणाच्या जलाशयात २३७.१६९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होता ज्याची टक्केवारी २९.२८ होते. गतवर्षी याच तारखेला ४७०.६६९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होता.

या खालोखाल निवळी (खूर्द) येथील करपरा मध्यम प्रकल्पांवर लाभक्षेत्रातील सुमारे बाराशे हेक्टरमधील पिकांच्या सिंचनाचे उद्दिष्ट असून परिसरातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना येथील पाण्यावर अवलंबून आहे. सरत्या आठवड्यात करपरा प्रकल्पात ०.०२७ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा होता. जो शून्य टक्के आहे.

याशिवाय जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र.२ अंतर्गतचे सात आणि जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे उपविभातंर्गतचे सोळा लघु सिंचन प्रकल्प आहेत.शिवाय अनेक पाझर तलाव आहेत. यापैकी भिलज येथील प्रकल्पात फक्त २५ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून देवगाव, जोगवाडा, बेलखेडा, वडाळी, चारठाणा, डोंगरतळा,

भोगाव, जांभरुन, चामणी, ईटोली, पुंगळा, मानधनी, साखरतळा, चिंचोली, जिंतूर, वरुड, अंबरवाडी, जूनूनवाडी प्रकल्प मार्च महिन्याच्या अखेरीस कोरडेठाक पडले आहेत. याशिवाय कृषी, जलसंधारण, वनविभाग व इतर यंत्रणेचे पाझर तलाव, कोल्हापूरी बंधारे, जलबांध सिमेंट बंधारे शेकडो आहेत. यातील किमान ऐंशी टक्के बंधाऱ्याचे ओळखीसाठी अस्तित्व शिल्लक दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT