press fourth pillar 
मराठवाडा

उपेक्षित घटकांना न्याय देण्यास पत्रकार ठरतात आधार- अशोक इंगोले

कोरोना काळात पत्रकारांनी जीवाची पर्वा न करता सर्वसामान्य समाज मनाचा "दुवा" म्हणून केलेली कामे उल्लेखनीय असल्याने सामाजिक न्याय विभा- बार्टी समतादूत वसमतच्या वतीने 'पत्रकारांचा गुण गौरव' ऑनलाईन कार्यक्रम घेण्यात आला.

संजय बर्दापूरे

वसमत ( जिल्हा हिंगोली ) : लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ (fourth pillar of democrocy) म्हणून समाज जीवनाचा आरसा असलेली मीडिया, वर्तमानपत्राच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यास नेहमीच पत्रकार हे महत्वाचा आधार (Important suport) असल्याचे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत अशोक इंगोले (Ashok Ingole) यांनी बार्टी समतादूतच्या वतीने बुधवारी (ता. १२) आयोजित पत्रकारांचा गौरव सोहळा ऑनलाईन कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले. (Journalists are the basis for giving justice to the neglected elements - Ashok Ingole)

कोरोना काळात पत्रकारांनी जीवाची पर्वा न करता सर्वसामान्य समाज मनाचा "दुवा" म्हणून केलेली कामे उल्लेखनीय असल्याने सामाजिक न्याय विभा- बार्टी समतादूत वसमतच्या वतीने 'पत्रकारांचा गुण गौरव' ऑनलाईन कार्यक्रम घेण्यात आला.

हेही वाचा - शिवसेनेचे मंत्री संदिपान भूमरेंनी संचारबंदीचे नियम तोडत कार्यकर्ते, ग्रामस्थांची गर्दी जमवत विकासकामांचे उद्‍घाटन केले होते

ऑनलाईन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे हे उपस्थित होते. महामानव डाॅ. बाबासाहेबांच्या विचाराना अभिवादन करीत आयोजक समतादूत मिलिंद आळणे यांच्या वतीने उपस्थितीत सर्व पत्रकाांचे शब्दसुमनाने स्वागत व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

या वेळी कोरोना काळातील पत्रकारांचे कार्य लक्षात घेता कोविड योद्धा पत्रकारांना सरकारने विशेष पॅकेज मंजूर करून त्याना प्राधान्याने वीमा कवच, लसीकरण व ऍक्रिडेशन कार्ड 'सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे मत संजय बर्दापूरे यांनी व्यक्त केले. तसेच बार्टी समतादूतांनी कोरोना परिस्थिती आपत्ती लॉकडाउन काळात परराज्यातील अडकलेल्या लोकांना जाण्यासाठी केलेले सहकार्य, मदत आणि ऑनलाईन प्रबोधन कार्यक्रम लक्षात घेता बार्टी समतादूताचे कार्ये उपक्रम प्रेरणादायी असल्याचे मत पत्रकारांनी व्यक्त करीत, गुण गौरव ऑनलाईन कार्यक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला.

आॅनलाईन सोहळ्याला बार्टीचे समतादूत अशोक इंगोले, सुरेश पठाडे, प्रफुल पट्टेबहादूर, सुनीता आवटे, संगीता खांदले, ऍड रहीम कुरेशी, बालाजी कटारे, सुकेश कांबळे आदीची उपस्थिती होती. प्रास्ताविक शंकर पोघे यांनी तर कार्येक्रमाचे सूत्रसंचालन गुरुनाथ गाडेकर यांनी केले. मिलिंद आळणे यांनी आभार मानले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

Record Breaking : १० चौकार, १२ षटकार! ३५३ च्या स्ट्राईक रेटने शतक; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम, २९ धावांत ९ गेल्या तरी संघ जिंकला

Latest Marathi News Updates : जयंत पाटील हे घाबरणारे नेते नाहीत - रोहित पवार

SCROLL FOR NEXT