Kadba
Kadba 
मराठवाडा

कडब्याची पेंढी २५ रुपयांना

शेखलाल शेख

औरंगाबाद - दुष्काळामुळे मराठवाड्यातील चाऱ्याची स्थिती गंभीर झाली आहे. पशुधन जगविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर  असताना चाऱ्याची (कडबा) किंमत प्रतिशेकडा २,५०० रुपये, अशी रेकॉर्डब्रेक झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

कडब्याचे भाव वाढल्याने एका बैलजोडीचा खर्चसुद्धा शेतकऱ्यांना परवडेनासा झाला आहे. यंदा कशीबशी बाजरी आली. त्यामुळे काही शेतकऱ्यांकडे बाजरीचा चारा (सरमाड) आहे; मात्र रब्बीत ज्वारीचे पीक अत्यल्प असल्याने कडब्याच्या किमतीने उच्चांक गाठला. औरंगाबादच्या रविवार बाजारात चांगल्या प्रतीचा कडबा २,५०० रुपये शेकडा दराने विकला जात आहे. मागील वर्षी त्याची १,५०० ते १,६०० रुपये दराने विक्री झाली होती. लहान आकाराच्या पेंढीची २,००० रुपये शेकडा दराने विक्री होते आहे. दुसरीकडे ऊससुद्धा महाग झाला आहे. ऊस २,२०० ते २,६०० रुपये प्रतिटन दराने विकला जात आहे. चाऱ्याच्या किमती वाढत असल्याने दुग्धउत्पादकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या मराठवाड्यात चारा नसल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातून चारा आणावा लागत असल्याचे विक्रेते हारुन शेख म्हणाले. 

दुग्धउत्पादक संकटात 
वैजापूर शहरापासून जवळ असलेल्या शांतिलाल पवार यांच्याकडे २० जनावरे आहेत. दुष्काळात ही जनावरे जगविण्यासाठी त्यांची कसरत सुरू आहे. त्यांच्याकडील बोअरला पाणी कमी पडत असल्याने जनावरांना त्यांना काही तासांच्या अंतराने पाणी पाजावे लागते.

बैलजोडीवर दिवसाकाठी २०० रुपये खर्च 
माळरानात चराईसाठी गवत नाही. शेतीतून कडबा मिळालेला नाही. त्यामुळे बहुतांश जणांना चारा विकत घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. एका बैलाला दिवसातून किमान चार ते पाच पेंढी चारा द्यावा लागतो. म्हणजे दिवसाला एका बैलाला १०० ते १२५ रुपयांचा चारा लागतो. दोन बैल असतील, तर हा खर्च दोनशे ते अडीचशे रुपये होतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Elections 2024: नगरमध्ये PM मोदींनी लालूंवर सोडले टीकास्त्र! मुस्लिम आरक्षणावरून सुरू झाला वाद, काय म्हणाले?

Ajit Pawar : दत्ता भरणेंचा शिवीगाळ केल्याच्या व्हिडिओ व्हायरल; अजितदादा म्हणतात, हस्तक्षेप केला कारण...

Gold Investment: सोन्याचे भाव भिडले गगनाला.. यंदाच्या अक्षय तृतीयेला सोने खरेदी करावी का? तज्ज्ञ काय सांगतात

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : कोल्हापूर-हातकणंगलेमध्ये मतदानावरुन वाद

SCROLL FOR NEXT