crop insurance sakal
मराठवाडा

कळमनुरी : बेचिराख गावांमधील शेतकरी यंदाही पीकविम्यापासून वंचित

गावे नाहीत; पण नोंदी आहेत!

सकाळ वृत्तसेवा

कळमनुरी : निजामकाळात पूर्वी जिथे वस्ती होती पण आता कुणी राहत नाही, अशा काही ठिकाण, स्थळांच्या महसूल खात्याकडे आजही पूर्वीच्या नावाने उजाड, ओसाड, बेचिराख गाव म्हणून नोंदी आहेत. थोडक्यात आता प्रत्यक्षात त्या ठिकाणी गाव नाही. पण, त्या परिसराची आजही गाव म्हणून नोंद आहे. अशा परिसरात शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना पीकविम्यापासून वंचित राहावे लागत आहे. प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या कळमनुरी तालुक्यातील देवदरी, खारवी, रहिमापूर, धुमका, गणगाव, कृष्णापूर, धानोरा, चिंचोर्टी, वसपांग्रा या नऊ गाव शिवारातील अनेक शेतकऱ्यांना यंदाही याचा फटका बसला. ते आपल्या पिकांचा विमा काढू शकते नाहीत.

कळमनुरी तालुक्यातील या नऊ गावांची ‘ओसाड किंवा बेचिराख गाव’ म्हणून अनेक वर्षांपासून सरकारी दप्तरात नोंद आहे. या गाव शिवारामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. पण, गतवर्षीपासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. पाणी शेतात जाऊन पीक हातचे जात आहे. दरम्यान, आपल्या पिकाचा विमा काढण्यासाठी अनेक शेतकरी पीकविमा केंद्रावर गेल्यानंतर ऑनलाइन विमा भरताना पोर्टलवर या नऊ गावांचे नाव येते.

पण, या गावाची उजाड गाव अशी नोंद महसूल दप्तरी असल्याने ही नऊ नावे व्हेरिफाय होत नसल्याने शेतकऱ्यांचा विमा निघत नाही. त्यामुळे नऊ गाव शिवारातील शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून पीकविम्यापासून वंचित राहावे लागत आहे. ही तांत्रिक अडचण दूर करावी, याचा शेतकरी पाठपुरावा करीत आहेत. पण, त्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांना पीकविम्यापासून वंचित राहावे लागत आहे.

नेमकी काय अडचण?

कळमनुरी तालुक्यातील नऊ गावांची ‘बेचिराख गाव’ म्हणून नोंद आहे. या नऊही गाव शिवारामध्ये अनेकांची शेती आहे. ऑनलाइन पीकविमा भरण्यासाठी या गावाचे नाव संबंधित संकेतस्थळावर येत आहे. परंतु, त्या ठिकाणी आता प्रत्यक्षात गावच नसल्याने ‘होल्डिंग व्हेरिफाय’ होत नाही. परिणामी, पीकविमा काढता येत नाही.

शेतकऱ्यांचे निवेदन

बेचिराख गावे व शेत शिवार तातडीने पीकविमा पोर्टलला जोडून या भागातील शेतकऱ्यांना पीकविमा भरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मंगळवारी (ता. १९) शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी गजानंद पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी डॉ. वसंतराव पतंगे, कैलास पतंगे, वैभव देशमुख, शंकर माने, बजरंग गिरडकर, सुदाम इंगोले, राजू पतंगे, विनोद माने, ज्ञानेश्वर पतंगे, विकास पतंगे, गोपीनाथ पतंगे, राजू माने, गजानन माने, भारत पतंगे, लक्ष्मण माने, मुकिंदा इंगोले, अविनाश पतंगे, सूरज पतंगे आणि बालाजी साखरे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Graded Driving License: काय आहे ग्रेड आधारित ड्रायव्हिंग लायसन्स? वाहतूक नियम भंग केल्यास रद्द होणार; नितीन गडकरी यांची घोषणा!

Latest Marathi News Live Update : आटपाडीचे पंचायत समितीचे नूतन सदस्य तृतीयपंथी दिलीप हेगडे यांचे हृदयविकाराने निधन

Gold Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठा बदल! महाराष्ट्रात 1 तोळ्याचा भाव किती? पाहा आजचा ताजा भाव

Pakistan Afghanistan Conflict : पाकिस्तानकडून अफगाणिस्तानविरुद्ध 'थेट युद्धा'ची घोषणा; काबुल आणि कंदहारमध्ये हवाई हल्ले

Dasun Shanaka: संघाबाहेरील नकारात्मक वातावरणाचा फटका; श्रीलंका कर्णधार दासून शनाकाने व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT