मराठवाडा

शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत कर्जमाफी सुरूच - चंद्रकांत पाटील

सकाळवृत्तसेवा

करमाड (जि. औरंगाबाद) - राज्यातील शेवटचा शेतकरी जोपर्यंत कर्जमुक्त होत नाही, तोपर्यंत कर्जमाफी योजना सुरूच राहील.

त्यानंतरही, कुणी कर्जमाफी अर्ज न भरल्याने वंचित राहिल्यास त्यांना अर्ज दाखल करण्यास वेळप्रसंगी मुदत देऊन शेतकरी कर्जमुक्त करूनच योजना बंद करू, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

करमाड (ता. औरंगाबाद) येथे सोमवारी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित युवा मेळाव्यात पाटील उद्‌घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे होते. विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे आदी उपस्थित होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवशी युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

पाटील म्हणाले, ""मागील तीन वर्षांपासून चांगले सरकार देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सामान्य माणूस व शेतकरी सुखी व समाधानी झाला पाहिजे हा प्रामाणिक हेतू आहे. एक लाख 67 हजार शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर कर्जमाफीचे पैसे आजपर्यंत जमा झाले आहेत. 43 हजार गावांमध्ये 200 मीटरने गावठाण हद्दीचा विस्तार करण्यास मंजुरी देण्यात आली असून 2011 पर्यंतची अतिक्रमणे नियमित करण्याचाही निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhadohi Renamed,: जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर ५ व्यांदा बदलले नाव; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा

IND vs WI : भारत अन् वेस्ट इंडिज संघावर आयसीसीने केली कारवाई; वन डे मालिकेत नेमकं असं काय घडलेलं?

Paithan Accident: पैठणमध्ये एसटी-दुचाकीची भीषण धडक; दोन तरुणांसह दोन वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू

व्हिटॅमिन E कॅप्सूल थेट चेहऱ्यावर लावू शकतो का? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पद्धत

Latest Marathi News Live Update : भैय्या माने यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू?

SCROLL FOR NEXT