

Vaibhav Suryavanshi | RR vs MI | IPL 2026
Sakal
RR vs MI Marathi News:इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत १३ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला मंगळवारी (७ एप्रिल) २७ धावांनी पराभूत केले. राजस्थानचा हा सलग तिसरा विजय होता. या सामन्यातही राजस्थानसाठी १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीकडून स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली. मात्र बाद होताच हो अत्यंत निराशही झाला.
पावसाचा अडथळा आलेला हा सामना ११-११ षटकांचा करण्यात आला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या राजस्थानकडून वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल यांच्या जोडीने पहिल्या चेंडूपासून वादळी खेळ करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी ३ षटकातच संघाला ५० धावा पार करून दिल्या होत्या.